अहिल्यानगर

शाळा उघडण्याबाबत सुरू आहे "शाळा", पालकांत संभ्रम

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा 15 जूनला सुरू करायच्या की एक जुलैला, याबाबत राज्य सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समित्यांकडून शिक्षण विभागाने अभिप्राय मागविले आहेत. हे सुरू असताना दुसरीकडे, मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण त्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्धार काही पालकांनी केला आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षण विभाग व शालेय व्यवस्थापन समितीपुढे संभ्रम निर्माण झाला आहे. 


शैक्षणिक वर्ष दर वर्षी 15 जूनपासून सुरू होते. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सगळेच गणित बिघडले आहे. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू होते की एक जुलैला, की त्यानंतर सुरू होणार, हे अद्याप राज्य सरकारने जाहीर केलेले नाही. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करायची घाई करू नये, असे मत पालक व्यक्त करीत आहेत. 

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाईक अंतर राखणे जमणार नाही. त्यामुळे पालकांना नेहमी काळजी लागेल. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत जसे अध्यापन केले जाते, तसेच अध्यापन सोशल माध्यमांचा वापर करून करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 15 जूनलाच शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागही संभ्रमात आहे. 

शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतेच निर्देश आलेले नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिप्राय मागविले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरगावांहून आलेल्या व्यक्तींना बहुतेक ठिकाणी शाळांमध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यांतील कोणत्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, याचीही माहिती मागविली आहे. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग 


सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरू करणे योग्य नाही. सुरक्षित अंतर राखणे विद्यार्थ्यांकडून होणार नाही. शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शाळास्वच्छता, सॅनिटायझेशन व इतर कामे करणे शक्‍य नाही. त्यामुळे तातडीने शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी नेमावेत. 
- गोवर्धन पांडुळे, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

IND vs SL: श्रीलंकन खेळाडूशी धडक, केएल राहुलचा कॉलचा गोंधळ अन् यशस्वी जैस्वाल रनआऊट! गॉलमध्ये ड्रामा...पाहा Video

SCROLL FOR NEXT