The self-help groups earned an income of Rs 50 lakh 
अहिल्यानगर

सव्वाशे बचतगट बनले आत्मनिर्भर... मास्कमधून कमावले इतके लाख...

सकाळ वृत्तसेवा

नगर  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. मात्र, महिला बचतगटांनी या काळात मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून उत्पन्न मिळविले आहे. जिल्ह्यातील 109 बचतगटांनी तीन लाख 44 हजार मास्कची निर्मिती करून सुमारे 50 लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचतगटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य व उत्पादनांची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटिंगसाठी जिल्हास्तरावर मार्केटिंग अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिला बचतगटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

सध्या कोरोनामुळे मास्कला मागणी वाढली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी, अशी स्थिती असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी सुती कपड्यांपासून मास्क तयार करण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील 109 बचतगटांनी तीन लाख 44 हजार मास्कची निर्मिती केली. त्यातील तीन लाख 38 हजार मास्कची विक्री झाली असून, त्यातून 49 लाख 50 हजाराचे उत्पन्न 109 बचतगटांना मिळाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील बचतगट सहभागी होऊ लागले आहे. मागणी वाढत असल्यामुळे आता उत्पादन वाढत आहे. 

मास्कची मागणी टिकून 
बचत गटांनी तयार केलेल्या मास्कला मागणी कायम असल्यामुळे मास्क बनविण्याची प्रक्रियाही बचत गटांकडून सुरु आहे. मास्क बनविण्याच्या प्रक्रियेत नव्याने बचत गटही सहभागी होऊ लागले आहेत.  

डिझाईन करण्याचा प्रयत्न

लहान मुलांना मास्कचे आकर्षण रहावे, यासाठी आता मास्कमध्ये डिझाईन करण्याचा विचार पुढे आलेला असून त्या दृष्टीने मास्क बनविण्याचे काम हाती घेण्याच्या हालचाली काही बचत गटांकडून सुरु झाल्या आहेत. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT