Senior social activist Annasaheb Hazare has advised Popatrao Pawar to continue the development of the village with the village in mind.jpg
Senior social activist Annasaheb Hazare has advised Popatrao Pawar to continue the development of the village with the village in mind.jpg 
अहमदनगर

गाव डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास सुरू ठेवा; अण्णांचा पोपटरावांना सल्ला

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : आता निवडणूक संपली आहे. गावासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. निवडणुकीत विरोधातील व्यक्ती पाहण्यापेक्षा संपूर्ण गाव पाहिले पाहिजे. व्यक्तीपेक्षा गाव मोठे असते. गाव डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास सुरू ठेवा. असा सल्ला जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी  पोपटराव पवारांना दिला.

आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी प्रथमच राळेगणसिद्धी हजारे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. यावेळी हिवरेबाजार निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल हजारे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांनी वयाचा विचार करता उपोषण करण्याऐवजी मौन आंदोलन करावे, अशी विनंती पवार यांनी हजारे यांना केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण केलेल्या मागण्या योग्य आहेत. सध्याचे वय पाहता आता उपोषण न करता मौन आंदोलन करावे. राष्ट्राला आणि समाजाला तुमची खूप गरज आहे. मौनात खूप ताकद असते आणि त्यातून जनतेमध्ये चांगला संदेश जाईल. आरोग्याची काळजी व दक्षता घ्या. तुमच्या सरकारकडे ज्या मागण्या आहे. त्यावर सरकार नक्कीच सकारात्मक प्रयत्न करील, असे सकाळशी बोलताना पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT