नगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केशकर्तनालय तसेच ब्युटीपार्लर बंद केली होती. काही लोकांनी त्यावर उपाय शोधत घरीच दाढी, कटिंग सुरू केल्या. त्यातूनच काहींनी थेट चमनगोटे केले. त्यामुळे शहराशहरात गावागावात टकलू हैवान गॅंग दिसू लागली होती. काहींनी तर केस व दाढीच केली नाही. त्यामुळे त्यांचा "अवतार' दिसत होता. परंतु, आता ते हॅंडसम दिसणार आहे.
केशकर्तनालय, ब्युटीपार्लर व्यावसायिकांची मागणी लक्षात घेता, उद्या (शनिवार) दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. हे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी जारी केले. जिल्ह्यातील सलून, ब्युटीपार्लर सुरू करण्यास अटी, शर्तीसह परवानगी दिली असून 30 जूनपर्यंत हे आदेश लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे.
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले. जिल्ह्यात 12 मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. जिल्ह्यातील सर्व सलूनची दुकाने 19 मार्चला बंद करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने जनजीवन पूर्णतः ठप्प झाले. मात्र, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सरकारच्या निर्णयानुसार बहुतांश बंधने सैल करण्यात आली. तरीही सलूनची दुकाने बंदच होती. दुकाने बंद असल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढावली. सलून व्यावसायिकांनी नगरमध्ये उपोषण देखील केले.
राज्यभरात आवाज उठवला गेल्यावर सलून व्यावसायिकांची मागणी लक्षात घेऊन सरकारने दुकाने सुरू परवानगी दिली. त्याच अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी सलून दुकानांसंदर्भात आदेश जारी करीत अटी, शर्तीसह परवानगी दिली.
"या' अटींवर सुरू राहतील दुकाने
- केवळ कटिंग, डाईंग, वॅक्सींग व थ्रेडिंगलाच परवानगी
-त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी नसल्याचे फलक लावणे बंधनकारक
-कर्मचाऱ्यांना ग्लोव्हज्, एप्रन व मास्क वापरणे अनिवार्य
- सामूहिक वापरात येणाऱ्या फ्लोरिंगची दर दोन तासांनी स्वच्छता करावी
-डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिनचा वापर करणे
-ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक
- पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास परवानगी नाही
- मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.