Shevgaon tehsil closed due to obstruction of two employees 
अहिल्यानगर

कोरोनाने पाडले शेवगाव तहसीलचे कामकाज बंद, दोन कर्मचारी बाधित

सचिन सातपुते

शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेली सहा महिने अग्रेसर असलेल्या महसुल विभागातच कोरोनाने शिरकाव केल्याने संसर्गाचा धोका वाढतच चालला असल्याने नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग प्रशासनाबोरोबरच नागरीकांचीही धास्ती वाढवणारा आहे. शहर व तालुका अनलाँक केल्यानंतर रुग्ण संख्या सातत्याने वाढत चालल्याने त्यावर अंकुश ठेवण्यात प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. सर्व सामान्य नागरीक कुठल्याच स्तरावर शारिरीक अंतर राखणे, मास्क व साँनिटायझर वापरणे, खरेदीसाठी गर्दी कमी करणे याबाबी पाळत नसल्याने तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ८०० च्या जवळपास पोहचला आहे.

तालुक्यातील ५८ गावात कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत नऊ रुग्णांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सद्य स्थितीत त्रिमुर्ती विदयालय, एकनाथ आयुर्वेद रुग्णालय, साई कोवीड सेंटर व नगर येथे २१६ रुग्ण उपचार घेत असून ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम करण्यात सगळ्यात आघाडीवर असलेल्या महसुल विभागातील दोन कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे काल निष्पन्न झाले आहे. त्यानंतर खडबडुन जागे झालेल्या प्रशासनाने तहसिल कार्यालयातील कामकाज अनिश्चित काळासाठी बंद ठेवले आहे.

तहसील कार्यालयाबरोबरच येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय, तालुका कृषी विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, आधार दुरुस्ती केंद्र, तलाठी कार्यालय आदी कार्यलय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होणार असला तरी कार्यालयातील व इतर सर्वच विभागातील संसर्ग रोखणे हे मोठे आवाहन ठरणार आहे. 

सद्यस्थितीत तहसिल कार्यालयातील दोन कर्मचारी कोरोना चाचणीत पाँझिटीव्ह आढळल्याने कार्यालयीन कामकाज तीन दिवसासाठी बंद ठेवले आहे. कार्यालयातील इतर कर्मचा-यांची चाचणी घेतल्यानंतर कामकाजाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरीकांनी वाढता संसर्ग लक्षात घेवून योग्य ती खबरदारी घ्यावी. 
                                                                                                          -अर्चना भाकड, तहसीलदार, शेवगाव.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: 'भारतीय बौद्ध महासभेचे साेलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन'; दीक्षाभूमीचे व्यवस्थापन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे देण्याची मागणी

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

IND vs PAK : Andy Pycroft हे भारताचे आवडते, रमीझ राजा यांचा जावई शोध! पण, Fact Check ने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडले

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

Share Market Opening: शेअर बाजारात अच्छे दिन! असं काय घडलं की अचानक सेन्सेक्स वाढला, निफ्टी २५,४०० वर

SCROLL FOR NEXT