Shiv sena warkari bhajani mandal protest over lathi charge on warkari dnyaneshwar palkhi sohala sakal
अहिल्यानगर

Lathi Charge on Warkari : शिवसेना वारकरी भजनी मंडळाचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिरप्रवेशावरून वाद उपस्थित झाला. याप्रकरणी भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने याची जबाबदारी घेऊन, तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली.

या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वारकरी मंडळातर्फे शहरातील बसस्थानकासमोर झालेल्या निषेध आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, की वारकऱ्यांच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला मुघल काळातही खंड पडला नाही.

मात्र, फडणवीस सत्तेत असताना मागील वेळीही वारकरी आणि वारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आताही लाठीचार्जचे पुरावे असताना गृहमंत्री फडणवीस, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही असे म्हणतात.

शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे म्हणाले, की या घटनाबाह्य सरकारने यावर तत्काळ वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यावेळी संपर्कप्रमुख नरेश माळवे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, संदीप रहाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

शहर शिवसेनेतर्फे वारकऱ्यांसोबत दिंडी काढून भजन-कीर्तन करीत संगमनेर शहर बसस्थानकासमोर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, शहर संघटक दीपक साळुंखे, शहर कार्याध्यक्ष अजीज मोमीन, विजय भागवत, संभव लोढा, वैभव अभंग, अक्षय गुंजाळ, गोविंद नागरे,

अमोल डुकरे, जनाभाऊ नागरे, सागर भागवत, विजय सातपुते, अक्षय गाडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, संगीता गायकवाड, आशा केदारी, योगेश बिचकर, सदाशिव हासे, एस. पी. राहाणे, सुदर्शन इटप, रवी गिरी, नितीन अनाप, संतोष कुटे, शोएब शेख, माधव फुलमाळी, मुकेश कचरे, प्रशांत खजुरे, लिंगमूर्ती चिंता भजनी मंडळ, अर्जुन आमले, राजेंद्र लोणारी, माधव अवसक, चंदू भागवत आदींसह तालुक्यातील वारकरी टाळकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT