In Shrigonda, doctors started singing in lockdown 
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात डॉक्‍टरांना फुटला कंठ.. लॉकडाउनमध्ये जोपासला गायनाचा छंद 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : अनेकांना वेळच नव्हता.. ना घरच्यांसाठी, ना मित्रांसाठी..! मात्र; कोरोना आला आणि सगळेच लॉकडाऊन झाले. मग काय, तरुणपणात राहिलेली हौस भागविण्यासाठी सोशल मीडियाचे आयतेच साधन मिळाले आणि अनेकांच्या गळ्याला कंठ फुटला. "बाथरुम सिंगर'च्या इमेजमधून बाहेर पडून अनेकांनी "सोशल मीडिया सिंगर' म्हणवून घ्यायची हौस भागवली. त्यात डॉक्‍टर पेशातील हरहुन्नरी लोकही दिसून आले. 

कोरोना आला आणि लॉकडाऊन झालेल्या अनेकांनी त्यांच्या सुप्त इच्छा-अपेक्षा, या आरामाच्या दिवसात उपभोगून घेतल्या. नेते मंडळींना ना कुणाचा अंत्यविधी, ना दशक्रियाविधी.. ना कुणाच्या विवाहाला हजर राहण्याचा आग्रह, ना पार्टी मिटिंगचा फोन.. त्यामुळे नेत्यांनीही त्यांच्या आवडींना स्थान दिले. व्यायाम, वाद्य वाजविणे, योगा शिकतानाच काहींनी पोहण्याचीही मजा लुटली.. 

हौसी डॉक्‍टरांनी लुटला आनंद

लॉकडाऊन काळात श्रीगोंद्यात सर्वाधिक आनंद लूटला, तो हौसी डॉक्‍टरांनी..! कारण, महाविद्यालयीन शिक्षणानंतर प्रॅक्‍टिस, कर्ज, पेशंट व हॉस्पिटलमध्ये सगळेच व्यस्त झाले होते. परिणामी, सगळे छंद बाजूला राहिले. स्वतःच्या आवडीनिवडीकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळच नव्हता. लॉकडाऊनमध्ये पेशंटची संख्या घटली आणि हे या छंदिष्ट लोकांच्या पथ्यावरच पडले. 

"सोशल मीडिया सिंगर' झाले

इतर वेळेसारखे "स्लॅक सिझन'मध्ये पिकनिकला जाता येत नव्हते. त्यामुळे रिकाम्या वेळेत "बाथरूम सिंगर'च्या इमेजमधून बाहेर पडून अनेक जण "सोशल मीडिया सिंगर' झाले. सोशल मीडियावर एकट्याने गायन करुन, कसे गातो, असे विचारताना एखाद्या मित्राला भरपूर "लाईक्‍स' मिळाल्याचे पाहून "आपण काय कमी' असे म्हणत दुसऱ्यालाही कंठ फुटण्याचे प्रमाण वाढले. कोरोनाच्या साथीत डॉक्‍टरची इमेज (त्यातल्या त्यात) सुधाल्याने व कोणी नावे ठेवणार नसल्याची खात्रीही पटली. त्यामुळे काहींना गाता येत नसतानाही फक्त ओठ हलवून गाणी डब करून वाहवा मिळविण्यासाठी काहींची धडपड सुरू असल्याचेही दिसले. 

वयाच्या पन्नाशीतही डान्सचा जलवा

"स्टार मेकर' ऍपच्या माध्यमातून काहींनी आवडत्या गायकासोबत गात असल्याचे इतरांना भासवून स्वत:ला खूश करुन घेतले. हेही काय थोडंक.. काही तर पन्नाशीनंतरही "गोविंदा'ला लाजवतील, असा डान्स करीत होते. "अभी तो मै जवॉं हूँ' दाखविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला चांगली दाद मिळाली. काहीही असो, कोरोनामुळे डॉक्‍टर मंडळींना स्वतःमधील सुप्त कलागुणांना जगासमोर मांडण्याची संधी मिळाली.. त्याचं त्यांनी सोन केलं हे नक्की..! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT