.... Signs that this city's water problem is over
.... Signs that this city's water problem is over 
अहमदनगर

.... या शहराचा पाणीप्रश्‍न सुटण्याची चिन्हे 

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः अनेक वर्षांपासून शहराचा पाणीप्रश्‍न कायम आहे. पाच क्रमांकाचे साठवण तळे झाले, की हा प्रश्‍न सुटू शकेल. त्यातील 20 फूट खोदाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आमदार आशुतोष काळे यांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यासाठी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडे घातले. नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका सकारात्मक आहे. एरवी कोपरगावच्या राजकारणात एकमेकांचे पाय ओढले जातात. मात्र, पहिल्यांदाच हा असा दुग्धशर्करा योग जुळून आला. पाणीप्रश्‍न कायमचा सुटण्याची अपेक्षा निर्माण झाली. 

आमदार काळे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत या कामाचे आश्वासन दिले. त्या वेळच्या प्रचारसभेत ज्येष्ठ नेते पवार यांनी, या कामाची जबाबदारी घेऊ, आमदारकी द्या, असे आवाहन मतदारांना केले. आमदारकी मिळाल्यानंतर लगेच आशुतोष काळे यांनी पवार यांना साकडे घातले. त्यांनी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्‍शनच्या संचालकांसोबत चर्चा केली. त्यांना 22 एकरांवरील तळ्याची खोदाई करण्याची सूचना केली. पूर्वी हे काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या, कंपनीने पवार यांच्या सूचनेनंतर लगेच आपली यंत्रसामग्री तळ्यावर आणली. लॉकडाउनच्या काळात सलग चार महिने खोदाईचे काम सुरू होते. 20 फूट खोदाई विनामूल्य झाली. खाली कठीण खडक लागला. 

आमदार काळे यांनी संकल्पचित्र संस्थेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील कामाचे संकल्पचित्र (आराखडा) महिनाभरात करून देण्याची सूचना केली. पालिकेने त्या पोटी 14 लाख रुपये त्यांना अदा केले. आता तळ्यात खाली भूस्तर कसा आहे, हे तपासण्यासाठी या संस्थेने बोअरदेखील घेतले. त्यांच्याकडून आराखडा आला, की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खर्चाचे अंदाजपत्रक तयार करील. त्याला सरकारदरबारी मान्यता मिळाली, की सुमारे 55 ते 60 कोटी रुपये खर्चाचे हे काम सुरू होऊ शकेल. आणखी 20 फूट खोदाई करून तळ्याला कॉंक्रिटीकरण करायचे आहे. अहमदनगर 

आमदार आशुतोष काळे यांनी पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पाठबळ लाभले. तळ्यात कठीण खडक लागला असला, तरी गायत्री कंपनीला समृद्धी महामार्गासाठी दगडाची गरज भासेल त्या वेळी ही कंपनीही पुढील खोदाई वेगाने करू शकते. 
- मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष, कोपरगाव  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT