Sina River polluted due to closure of sewerage project 
अहिल्यानगर

सीना नदीच्या शुद्धीकरणात "हे' कारण ठरतेय अडसर

दत्ता इंगळे

नगर : महापालिकेचा 42 कोटींचा मलनिःस्सारण प्रकल्प अपूर्ण असल्याने सीना नदी आजही प्रदूषित आहे. हा प्रकल्प मार्गी लागला, तर सीना नदी स्वच्छ होईल. मात्र, कोरोनामुळे हे काम ठप्प झाले आहे. 

सीना नदी 14 किलोमीटर भाग नगर शहरातून वाहतो. कचरा, मृत प्राण्यांचे अवशेष नदीत फेकले जाते. शहरातून रोज सुमारे साडेतीन कोटी लिटर (35 एमएलडी) मैलामिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता, थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी अधिक दूषित झाली आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिका प्रशासनाला वेळोवेळी नोटिसा बजावल्या. 

राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार 

शहराजवळील काही शेतकऱ्यांनी दूषित सीना नदीमुळे पिकांवर विपरित परिणाम होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडेही तक्रार केली. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने मल:निस्सारण प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. 

भुयारी गटार व मलनिःस्सारणाच्या 131 कोटींच्या प्रकल्पाला सप्टेंबर-2017 मध्ये मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश येण्यासाठी पुन्हा वर्ष लागले. जून-2018मध्ये योजनेला कार्यारंभ आदेश दिले. मलनिःस्सारणाचेही काम दोन वेळा बंद पडले. जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. 

लॉकडाउनमुळे काम ठप्प 

लॉकडाऊनमुळे प्रकल्पाचे काम थांबले होते, मात्र आता काम सुरू झाले आहे. पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. त्यानंतर यंत्र बसवावे लागणार आहेत. ही यंत्रसामुग्री परराज्यातून मागवावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे ही यंत्रसामुग्री शहरात आणणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. 

फरयाबाग येथे होणार शुद्धीकरण 

मैलामिश्रीत पाणी साठवण्यासाठी फुलसौंदर मळ्यातील जागा महापालिकेने खरेदी केली. तेथून वीजपंपाद्वारे हे पाणी फरयाबाग येथील मैला शुद्धीकरण केंद्रावर नेले जाईल. तेथे प्रक्रिया करून ते शेतकऱ्यांना किंवा नाल्यात सोडून दिले जाणार आहे. प्रकल्प झाल्यावर सीना नदी प्रदुषणाचा प्रश्न सुटण्याची शक्‍यता आहे. हरित लवादाकडे काम लवकर पूर्ण होण्याबाबत सुनावणी सुरू आहे. 

काम अंतिम टप्प्यात

मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पातील सिव्हिल वर्कचे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर मेकॅनिकल कामे शिल्लक राहतील. प्रकल्पाची यंत्रसामुग्री लॉकडाउन संपल्यावर आणू. 
- परिमल निकम, यंत्रअभियंता, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रमुख संशयित पीएसआय गोपाल बदने निलंबित

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT