Maratha Community
Maratha Community sakal
अहमदनगर

अहमदनगर : मराठ्यांच्या अन्नात माती कालवली

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation)निर्णय होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे सगळे म्हणतात. आम्ही समर्थन दिले. ओबीसीचे फक्त राजकीय आरक्षण गेले, आमचे मराठा समाजाचे तर सगळेच आरक्षण रद्द झाले. काही विघ्नसंतोषी लोकांमुळे गरिब मराठा(Maratha) तरुणांच्या अन्नात माती कालवण्याचे काम केले आहे, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आमदार विनायक मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसंग्रामचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे, श्याम ढोकणे, नवनाथ इसरवाडे, अशोक मगर, पांडुरंग पवार, नंदकुमार गोसावी, सुनील फाटके आदी उपस्थित होते. मेटे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वप्रथम आम्ही आवाज उठवला, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात आंतराष्ट्रीय दर्जाचे स्‍मारक व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा केला. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वप्रथम औरंगाबादेत २००७ साली परिषद घेतली.

आता ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने या आरक्षणावर निर्णय होईपर्यत निवडणुका घेऊ नयेत, असा विधीमंडळात ठराव झाला. आमचे त्याला समर्थन आहे. मात्र, तो ठराव कायद्याला धरुन आहे का? याबाबत अम्ही विचारले असता सरकार बोलत नाही. ओबीसी आरक्षण रद्द व्हायला ओबीसी मंत्री कारणीभूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे कामही सरकारच्या दुर्लक्षामुळेच बंद आहे.मेटे म्हणाले की, राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे. कोण काय बोलतोय याचा ताळमेळ नाही. त्यामुळे अधिकारी फायदा घेत आहेत. चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचा मात्र महाराष्ट्रातील सामान्य लोकांना त्रास सोसावा लागत आहे.

मंत्र्यांच्याच जिल्ह्यात गैरव्यवहार

कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यात कृषी विभागात, वीजमंत्री, वीज राज्यमंत्र्याच्या जिल्ह्यात वीज विभागात गैरव्यवहार होत आहेत. कोरोनाच्या नावाखाली शेतकरी, सामान्य माणसाला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, असे ते म्हणाले.(Ahmednagar news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT