Sonali Barde sakal
अहिल्यानगर

‘महाराष्ट्र केसरी’ बर्डेंच्या मुलीवर गोळीबार

विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : शहरात आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता प्रगती शाळेसमोरील आदिवासी समाजाच्या वसाहतीत गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यात, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

शहरातील प्रगती शाळेसमोरील आदिवासी वसाहतीमध्ये शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांत आज जोरदार भांडण झाले. सहा महिन्यांपूर्वी लहान मुलांच्या कारणावरुन दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. नामदेव पवार, अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, सुरेश नामदेव पवार यांचे शेजारी राहणाऱ्या सोनाली बर्डे व त्यांच्या पतीसमवेत जोरदार भांडण झाले. अंकुश पवार याने गावठी पिस्तुल काढून सर्वांसमक्ष गोळीबार केला. यावेळी सोनाली बर्डे यांच्या कडेवर लहान मुलगा असल्याचे समजते.

पिस्तुलाची गोळी सोनाली बर्डे यांच्या हाताच्या मनगट व कोपराचा मध्ये लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी अवस्थेत सोनाली बर्डे यांना नगर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, राहुरी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Narsapur Case Verdict: नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भिमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

IPO Investment: पहिल्याच दिवशी पैसाच झाला दुप्पट! 208 रुपयांचा शेअर थेट 415 रुपयांवर; IPO गुंतवणूकदार मालामाल

देणग्या आणि व्यवहारांचा हिशोब द्या! PMOकडून मागणी, पण राम मंदिर ट्रस्टचा नकार

Latest Marathi News Live Update : नसरापूरचा नराधम दोषी, शिक्षेची सुनावणी २९ जूनला

Massive Earthquake: मैदानात सामना सुरू होता अन् अचानक जमीन हादरू लागली... तीव्र भूकंपावेळीचा Video Viral

SCROLL FOR NEXT