Speaker dies after falling into a well 
अहिल्यानगर

सभापतींचा विहिरीत पडल्याने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रेय बोऱ्हाडे(वय 55, रा. केळी ओतूर) यांचा विहिरीत पडून सोमवारी (ता. 18) अपघात झाला. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 

अधिक माहिती अशी की, ते शेतातील विहिरीत नाड्याच्या आधाराने उतरत असताना त्यांचा अपघात झाला. यात त्यांची छाती, पाय व मणका फ्रॅक्‍चर झाला. त्यांना तातडीने नाशिक येथील शताब्दी रुग्णालयात सोमवारी हलविण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्याची शस्त्रक्रिया झाली. मात्र, आज सकाळी दहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अकोले तालुक्‍यात शोककळा पसरली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रपंच सावरत त्यांनी समाजकारण व राजकारणात यश मिळविले होते. नुकताच त्यांनी अकोले तालुका पंचायत समिती सभापतिपदाचा पदभार स्वीकारला होता.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी प्रत्येक गावात योग्य नियोजन करून तालुका आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, सोमवारी दुपारी ते विहिरीत पडून जखमी झाले. उपचारासाठी त्यांना माजी आमदार वैभव पिचड यांनी तातडीने नाशिक येथे हलविले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

PM Modi Birthday Look: टोपीवर कमळ, खांद्यावर रंगबिरंगी शाल, पंतप्रधान मोदींचा वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला खास लूक

Asia Cup 2025: पाकिस्तानच्या रडारडीनंतर अखेर सुवर्णमध्य निघाला; ICC ने सामन्याधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT