The state has decided to start classes IX to XII from November 24.jpg 
अहिल्यानगर

शिक्षकांच्या चाचणीनंतरच आठवीपर्यंतचे वर्ग भरणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यावर, आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीपर्यंतच्या 6614 शिक्षकांच्या कोरोनाचाचणी होणार आहे; परंतु या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर वर्ग भरविले जाणार आहेत. 

राज्यात 24 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याअगोदर शिक्षकांची कोरोनाचाचणी करण्यात आली. कोरोनाचाचणीचे अहवाल जिल्ह्यातील शिक्षकांना वेळेत मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली होती.

अनेकांना घशातील स्त्राव दिल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी अहवाल मिळाले. त्यामुळे यावेळी तरी प्रशासनाने नियोजन करून शिक्षकांना कोरोना चाचणी करावी व तपासणीनंतर तातडीने दुसऱ्या दिवशी अहवाल मिळावेत, अशी मागणी होत आहे. पाचवी ते आठवीपर्यंत जिल्ह्यात 2003 शाळा असून, 3 लाख 7 हजार 777 विद्यार्थीसंख्या आहे. त्यांना 6614 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

IPL Auction : जडेजाची कॉपी! CSKने उगाच १४ कोटी नाहीत मोजले, प्रशांत वीरचे Six एकदा बघाच... Video Viral

SCROLL FOR NEXT