state president of the Youth Congress satyajit tambe held a meeting of Congress workers in Shirdi on Saturday.jpg 
अहिल्यानगर

नेतृत्वाविषयी लोकांमध्ये राग; सत्यजित तांबे यांची आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी (अहमदनगर) : युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शनिवारी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन, राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा शंख फुंकला. 'शिर्डी मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाविषयी लोकांच्या मनात राग आहे. मात्र, कुणाच्या भरवशावर विरोध करायचा, अशी त्यांची आजवर भावना होती. त्यासाठी आता आम्ही यंत्रणा उभी केली आहे. राहात्यात विखे-पिपाडा युती लोकांना आवडलेली नाही, तसेच शिर्डी नगरपंचायतीत विखेंना आजवर काठावरचीच सत्ता मिळत आली,' अशी टीका त्यांनी केली.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला
 
तांबे यांनी शनिवारी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तिथे त्यांनी विखे पाटलांवर टीकेच्या फैरी झाडल्या. 'आगामी शिर्डी नगरपंचायत व राहाता नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलने करा,' असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बैठकीपूर्वी शिर्डी येथील शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेचा उल्लेख त्यांनी बैठकीत केला.

बांधकाम व्यावसायिकाचे बेपत्ता कुटुंब पुण्यात सापडले
 
तांबे म्हणाले, 'दोन्ही पालिकांच्या निवडणुकीत विखे विरोधकांची मोट बांधू. पूर्ण ताकदीनिशी लढाई करण्यासाठी लोकांना आत्मविश्वास देऊ. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुढील सात महिन्यांत लोकांच्या प्रश्नांवर आंदोलने करावीत. राहात्यातील विखे-पिपाडा युती लोकांना आवडलेली नाही. डॉ. राजेंद्र पिपाडा यांची ओळख विखे विरोधक, अशी होती. त्यांनी विखे यांना शरण जाणे लोकांना आवडलेले नाही.'

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
सुरेश थोरात, सचिन चौगुले, प्रसाद शेळके, स्वराज त्रिभुवन, श्रीकांत मापारी, उमेश शेजवळ, प्रा. जयंत गायकवाड, विक्रांत दंडवते, सचिन गाडेकर आदींसह कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. बैठकीपूर्वी शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, राहुल गोंदकर, सचिन कोते, राष्ट्रवादीचे नीलेश कोते आदींनी तांबे यांची भेट घेऊन आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीबाबत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

SCROLL FOR NEXT