Stop buying lemons under pressure 
अहिल्यानगर

दबाव आणल्यास लिंबूखरेदी बंद... श्रीगोंद्यात व्यापाऱ्यांचा इशारा 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्‍यातील पहिल्या फळीतील नेते, लिंबूउत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी काल (सोमवारी) दोन तास बैठकांचे सत्र चालले. समिती स्थापन झाली; पण पहिल्याच दिवशी समितीचा प्रभाव दिसला नाही. "आम्हीही शेतकऱ्यांची मुले आहोत. नाहक कुणी दबाव आणू नका, अन्यथा लिंबूखरेदी बंद करू,' असा गर्भित इशाराच व्यापाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे पुढे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 

श्रीगोंद्यात लिंबूउत्पादकांची दराबाबत हेळसांड होत आहे. शेतकरी व त्यांचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातून व्यापारी - शेतकरी संघर्ष पेटण्याची (पेटविण्याची) शक्‍यता होती. बाजार समितीचे काही पदाधिकारी व सचिव यात हस्तक्षेप न करता सूचना करण्यावर भर देताना दिसले. 

दरम्यान, या प्रश्‍नावर काल (सोमवारी) पहिल्या फळीतील नेते बाजार समितीत ठाण मांडून होते. काहींना व्यापाऱ्यांची, तर काहींना शेतकऱ्यांची काळजी दिसली. दराबाबत बैठकीतून व्यापाऱ्यांनी काढता पाय घेत, खरेदी करणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर तहसीलदार महेंद्र माळी यांनी "कारवाई करू,' अशी भूमिका घेतल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा समजूतदारपणा दाखवीत बैठकीला हजेरी लावली. 

बैठकीत महानगरांत मिळणाऱ्या लिंबांच्या दरातून खर्च वजा जाता, श्रीगोंद्यातील व्यापारी दर देतील, असे ठरले. त्यासाठी एक समिती नेमल्याचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी जाहीर केले. मात्र, या निर्णयाचा आज पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. असा निर्णय ठरल्याने बाजार समितीत लिंबांचे लिलाव व्यापाऱ्यांनी केले नाहीत. महानगरांतील दराची माहिती येईपर्यंत व्यापाऱ्यांनी पाच रुपये किलोप्रमाणे लिंबूखरेदी केली. त्यानंतर शहरातील दर आले; मात्र त्यातही निश्‍चिती नसल्याने सगळ्यांनीच हात वर केले. 

जास्त दर देऊ शकत नाही : पोटे 
"सकाळ'शी बोलताना व्यापारी संचालक व लिंबू व्यापारी उमेश पोटे म्हणाले, ""आम्ही शेतकऱ्यांचीच मुले आहोत. त्यामुळे आम्ही योग्य दर देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र, काही लोक जास्त दर देण्यासाठी व्यापाऱ्यांवर नाहक दडपण आणत आहेत. सध्याच्या स्थितीत आम्ही जास्त दर देऊ शकत नाही, कारण आम्हालाच तो मिळत नाही. शेतकऱ्यांना आज लिंबू परवडत नाही हे सत्य असले, तरी आमचेही काही आलबेल आहे असे नाही. आमच्यावर असाच दबाव राहिला, तर लिंबूखरेदी बंद ठेवण्याच्या मनःस्थितीत आलो आहोत.''   अहमदनगर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT