The story of Eknath Mahadu Binnar in Akole taluka 
अहिल्यानगर

जनावरांना ऐवढा लळा लागला आहे की एका विशिष्ट आवाजात त्याचं सर्वच ऐकतात

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : निसर्गाच्या कुशीत असलेल्या आंबेवाडी येथे डांग जनावरांचे संवर्धन करण्याचे  काम येथील एकनाथ महादू बिन्नर हा गुराखी करत आहे. एका विशिष्ट हकेत ही जनावरे एका ठिकाणी विश्रांती करतात व विश्रांती झाल्यावर हुईके म्हटल्यावर व शिळ घातल्यावर एका रांगेत त्याच्या मागे चालतात.

अलंग, कुलांग, मलंग गडावर रोज आंबेवाडी ते गड असा त्यांचा प्रवास असतो. सुमारे शंभर जनावरे घेऊन हा गुराखी डांग जातीचे गाई, गोऱ्हे, कालवड सांभाळून आपले दहा माणसांचे कुटुंब सांभाळत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दहा वर्षांपासून तो हे काम अविरतपणे करत आहे. पावसाळा पूर्वी तो आपली जनावरे कोकणात घेऊन जातो. दसरा सणा पूर्वी जनावरे पुन्हा आपल्या आंबेवाडी येथे आणून त्यांचे पालनपोषण करतात. डांग जातीचे जनावरे सध्या कमी होत असून शेतकरी त्यांचे उत्पादन कमी असल्याने जनावरे सांभाळणे दुरापास्त होत असताना आंबेवाडी गावात पाचशे डांग जनावरे असून येथील ग्रामस्थ शेतीबरोबर डांग जनावरे सांभाळून आपले कुटुंब चालवतात.

मात्र सांभाळ करताना त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम देखील करतात तर एका विशिष्ट हाकेत ही जनावरे चालू लागतात. गुरख्याच्या मागे चालत डोंगरावर जाऊन चारा खाऊन पोट भरल्यावर पुन्हा गडावरून घराकडे येतात. एका विशिष्ट आवाजाने हे डांगी जनावरे बसतात उठतात व चालायला लागतात. 

डांगी पशुधन हे आदिवासी भागाचे वैभव असून डांगी गाई म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारातील लक्ष्मी असल्याचे शेतकरी सांगतात. देशामध्ये एकूण २७ प्रकारच्या दूध देणाऱ्या गाई आढळतात त्यापैकी डांगे प्रजाती ही तिच्या खास वैशिष्ट्यांमुळे पहिल्या तीन मध्ये समाविष्ट होते हे गौरवास्पद आहे.तालुक्यात आढळणार्‍या डांगे प्रजातींचे जी आय मानांकन होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच डांगी गायीच्या गोमूत्र पासून विविध प्रकारचे व पदार्थ तयार करण्यावर भर दिला पाहिजे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

Alcohol Risk : दारू पिऊन झाल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ; नाहीतर हँगओव्हर होईल डबल अन् लवकरच गमवाल जीव

Karad Kidnapping Case : गाडी अडवली, मारहाण केली अन् उचलून नेलं; कऱ्हाडजवळ व्यापाऱ्याचे सिनेमा स्टाईल अपहरण!

Pune: मेट्रो प्रवाशांसाठी अलर्ट! कच्चे मांस आणि सुके मासे घेऊन प्रवास केल्यास ट्रेनमध्ये ‘नो एंट्री’; कठोर नियम लागू

Solapur Crime : घरगुती वादातून मुलाने केला वडिलांचा घात; वन्यप्राणी हल्ल्याचा बनाव करत लपवला होता गुन्हा!

SCROLL FOR NEXT