The story of Leader of Opposition Devendra Fadnavis educational journey 
अहिल्यानगर

इंदिरा गांधी शाळेचे नाव होते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शाळाच सोडली होती : Video

अशोक मुरुमकर

अहमदनगर : भाजपचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांनी कामातील प्रामाणिकतेबद्दल कौतुक केलेले आपण पाहिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून अनेक विरोधकही त्यांच्याकडे पाहतात.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर स्वयंसेवक आहेत. बालपणापासूनच ते संघाच्या कामाने प्रभावित झाले होते. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 

देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. यातूनच देवेंद्र फडणवीस यांना संघाबद्दल आकर्षण वाटू लागले. ते संघात जाऊ लागले. दहा वर्षाचे असताना त्यांच्या मनात बंडखोरीची आग मनात पेटली. आणीबाणीच्या काळात त्यांचे वडील गंगाधर फडणीस यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. त्या घटनेने देवेंद्र फडणवीस यांच्या मनावर खोल परिणाम झाला. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यांनी घरी सांगितले, ‘मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. कारण ज्या इंदीरा गांधी यांनी माझ्या वडिलांना तुरुंगात टाकले. त्यांच्या नावाने असलेल्या शाळेत मी जाणार नाही’. 
दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच एका मुलखतीमध्ये देवेंद्र फडणीवस यांनी त्या घटनेबद्दल खुलासा केला होता. त्यात ते म्हणाले होते ‘मी पहिलात असताना माझ्या वडिलांना दोन वर्ष इंदिराजी गांधी यांनी तुरुंगात टाकले. त्यामुळे त्यांच्या नावाने असलेल्या शाळेत मी जाणार नाही, असं आईला सांगितले होते.’ 

बीजेपी महाराष्ट्र या फेसबुक पेजवर बुधवारी वाढदिवसाचे औचित्य साधून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. १५ तासात याला ३२ हजार व्ह्यूज आले आहेत. सुमारे चार हजार लाईक आले असून २४१ शेअर आहेत. त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रीयाही मोठ्याप्रमाणात आल्या आहेत. 

यावर प्रभाकर सोनवणे यांनी म्हटलं आहे की, चतुर राजकारणी, उत्तम प्रशासक, सर्व क्षेत्रातील सखोल माहिती, थेट तळापर्यंत प्रत्येकाला शासकीय योजनाचा लाभ देणारे फडणवीस यांना शुभेच्छा. भगवान बरगळे यांनी म्हटलंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरसेवक, नागपूरचे सर्वात तरुण महापौर, आमदार, मुख्यमंत्री अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम पाहिले. त्यांना शुभेच्छा. त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधकांनी मात्र टिका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT