amc nagar 
अहिल्यानगर

महापालिका कामगार संघटनेला यश : कर्मचाऱ्यांची उद्यापासून आरोग्य तपासणी 

अमित आवारी

नगर : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण होते. त्यामुळे या इमारतीत गेली तीन दिवसांपासून कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. अहमदनगर महापालिका कामगार संघटनेनेही जोपर्यंत महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या होत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्याशी चर्चा केली. यात उद्यापासून (गुरुवार) महापालिका कामगारांची कोरोना विषयक आरोग्य सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे उद्यापासून नवीन महापालिका इमारतीतील कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. 

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांत कोरोनाची भीती पसरली. महापालिकेच्या स्वॅप संकलन केंद्रात महापालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी गर्दी करण्यास सुरवात केली. कर्मचाऱ्यांनी नवीन प्रशासकीय इमारतीत काम करण्यास नकार दिला. अहमदनगर महापालिका कामगार संघटनेनेही कामगारांच्या भुमिकेचे समर्थन केले. सर्व कामगारांची कोरोना विषयक वैद्यकीय तपासणी करावी, त्यांना सुरक्षा साधने द्यावीत, नवीन प्रशासकीय इमारतीत नागरिकांचा प्रवेश बंद करावा या मागण्या कामगार संघटनेने केल्या होत्या. 

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील कामकाज तीन दिवस ठप्प राहिले. अखेर आज दुपारी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले. यावेळी महापालिका आयुक्‍त मायकलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, उपाध्यक्ष अय्युब शेख, अकील सय्यद  उपस्थित होते. 

या बैठकीत महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल तसेच नवीन प्रशासकीय इमारतीत अतिशय महत्त्वाचे काम असणाऱ्याच नागरिकांना प्रवेश देण्यात येईल असे निश्‍चित करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.30 वाजता कामावर रुजू व्हावे. त्यांच्या कामाच्या जागेवर महापालिकेचे वैद्यकीय पथक येईल. हे पथक ऍन्टीजन तपासणी, पल्स व ऑक्‍सिजन काउंट तसेच थर्मल स्कॅनिंग करेल. या तपासणीत पॉझिटिव्ह येणाऱ्यांचेच स्वॅप घेण्यात येतील. उद्या या तपासणीच्या वेळी खासदार, महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्‍त उपस्थित राहतील. 

टप्प्या टप्प्याने महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. फिल्डवरील महापालिका कर्मचाऱ्यांची दर आठवड्याच्या सोमवार व गुरुवारी वैद्यकीय तपासणी हजेरीच्या ठिकाणी करण्यात येईल. या तपासणीची नोंद महापालिकेच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात दोन सुरक्षा रक्षक व एक लिपिक संवर्गातील कर्मचारी असतील. ते महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना थांबवून अत्यावश्‍यक कामासाठी आलेल्या नागरिकांनाच महापालिकेत प्रवेश देतील. उर्वरित नागरिकांची कामे प्रवेशद्वारातच पूर्ण होतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. अवश्‍यता असेल तेथील महापालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, हातमोजे अशी सुरक्षा साधने व पीपीई किट देण्यात येणार आहे. ही सुरक्षा साधने मिळाल्याची खबरदारी घेऊनच कर्मचाऱ्यांना काम देण्यात येईल असे आदेश महापौर व आयुक्‍तांनी दिले. 

महापौरांनी आज घेतलेल्या बैठकीत ठोस आश्‍वासन मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळी 9.30 वाजता कामावर रुजू व्हावे. त्यांची कोरोना विषयक वैद्यकीय तपासणी होणार आहे. कामकाज करताना कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT