AJit pawar and sujay vikhe patil
AJit pawar and sujay vikhe patil 
अहमदनगर

सुजय विखे अजित पवारांच्या कानात बोलू लागले, आणि दादांनी चार वेळा हात जोडले!

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राऊत यांच्यावरील ईडी कारवाईमुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यातच शरद पवार यांची दिल्लीतील 'डिनर डिप्लोमसी' यानंतर त्यांनी घेतलेली नरेंद्र मोदींची भेट, यामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डीत होते. यावेळी आणखी वेगळं राजकीय चित्र पाहायला मिळालं.

२०१९ ला नगरची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी होत होती. मात्र, विखे पाटील हे त्यांचे पुत्र सुजय विखेंना काँग्रेसमधून जागा देण्यावर ठाम होते. अखेर विखेंनी भाजपात प्रवेश केला. आघाडीला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादीविरोधातच दंड थोपटले.

मात्र, आता विथे आणि पवारांमधील विस्तव गार झालाय. आज अजित पवार शिर्डीत कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. कोपरगावात सुरू असणाऱ्या एका कार्यक्रमात सुजय विखे देखील स्टेजवर उपस्थित होते. गृहमंत्री वळसे पाटील यांचं भाषण सुरू होतं.

यावेळी सुजय विखे अजित पवारांच्या बाजूला येऊन त्यांच्या कानात काहीतरी सांगू लागले. अजित पवारांना विनंती करत असल्याचं प्रथमदर्शनी दिसलं. या संभाषणा दरम्यान अजित पवारांनी चार वेळा हात जोडले. ३० सेकंद चाललेल्या बोलण्यात दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे मात्र स्पष्ट झालं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT