Actor Suniel Shetty Supports Cultural Ban, Suggests Films on Sai and Nation Sakal
अहिल्यानगर

Sunil Shetty: पाकिस्तानी कलाकारांना बंदी योग्यच : सुनील शेट्टी; साईसमाधीचे घेतले दर्शन, चित्रपट तयार व्हावेत

Suniel Shetty Backs Ban on Pakistani Artists : आम्ही कधीही कुणाबरोबर आपणहून युध्द केलेले नाही. कुटुंबाला एकत्र बसून पाहता येतील, असे माझे चित्रपट आहेत. माध्यम कुठलेही असोत सर्वत्र असेच चित्रपट तयार व्हायला हवेत, असे मत हिंदी चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी याने व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : माझी जन्मभूमी कर्नाटक आणि कर्मभुमी मुंबई आहे. मला मराठी बोलता यायला हवे, त्यासाठी प्रयत्न करायला हवा. पहेलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास बंदी हे योग्य पाऊल आहे. हिंदू, हिंदूत्व आणि सनातन धर्माची शिकवण धर्म, सेवा आणि कर्म ही आहे. आम्ही कधीही कुणाबरोबर आपणहून युध्द केलेले नाही. कुटुंबाला एकत्र बसून पाहता येतील, असे माझे चित्रपट आहेत. माध्यम कुठलेही असोत सर्वत्र असेच चित्रपट तयार व्हायला हवेत, असे मत हिंदी चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी याने व्यक्त केले.

आज त्याने येथे येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने वरील मतप्रदर्शन केले.

सुनील शेट्टी म्हणाला, माझ्या लवकरच प्रदर्शित होत असलेल्या हेराफेरी-३ या चित्रपटाबद्दल मी आताच काही बोलणार नाही. गेल्या सहा वर्षांत माझी पत्नी दरवर्षी साईदर्शनासाठी आली. मला मात्र येता आले नाही. बाबांनी बोलावले आणि मी दर्शनासाठी आलो. बाबांचे दर्शन घेताना माझे डोळे पाणावले. मी बाबांकडे कधीही आणि काहीही मागितले नाही.

माझ्या आईसह कुटुंबाची आणि देशातील सर्वांचे आरोग्य चांगले रहावे, अशी प्रार्थना केली. माझा १९ च्या दशकातील बलवान हा चित्रपट लोक अद्यापही लक्षात ठेवतात. कारण त्यातील संगीत आणि गाणी देखील चांगली होती.

महानायक अभिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर माझे आयडॉल आहेत. प्रत्येकाला असे आयडॉल आणि गुरू आवश्यक असतात. ते आपल्याला जीवनाची योग्य ती वाट दाखवतात आणि प्रेरणा देतात. साईबाबा गुरू आहेत ते आपल्याला योग्य ती वाट दाखवतात.

-सुनील शेट्टी, अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संतापजनक घटना! 'आंतरधर्मीय विवाह करून युवतीची फसवणूक'; पहिल लग्न लपवलं, ओळखीचे रूपांतर मैत्रीत त्यानंतर प्रेमात अन्..

धक्कादायक! पूजा करायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; क्रूर कृत्यानंतर मुलगी बेशुद्ध, निर्जनस्थळी नेलं अन्...

Language And AI : भाषेची वाटचाल माणसाच्या हृदयातून यंत्राच्या मेंदूकडे?

ख्रिश्चन बांधव आक्रमक! 'आमदार गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विषयी वापरले अपशब्द'; गुन्हा दाखल करा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये ठाकरे गटाची मुस्कटदाबी; फक्त ४ नगरसेवक उरले

SCROLL FOR NEXT