अहिल्यानगर

शेतकऱ्यांना मिळतोय मेसेजद्वारे हवामान अंदाजासह कृषी सल्ला

रहिमान शेख

सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाचे आकडेवारी दिली जाते.

राहुरी विद्यापीठ (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Rahuri) येथील कृषी विद्या विभागांतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प (Rural Agricultural Meteorological Service Project) कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे आठवड्याच्या दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील तालुकानिहाय हवामान अंदाज (Weather forecast) व त्या आधारित कृषी सल्ला (Agricultural advice) दिला जातो.

गेल्या वर्षभरापासून हवामानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी हवामान आधारित हा कृषी सल्ला व्हॉट्सअँपद्वारे देण्यात येतो, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या कृषी विद्या विभागातील प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. (Taluka wise weather forecast in Ahmednagar district and based on that agricultural advice is given through message)

सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाचे आकडेवारी दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो. एम किसान या ऐपद्वारे सुमारे ५ लाख लोकांना टेक्स्ट मेसेज मिळत आहेत व व्हॉट्सअँपद्वारे सात हजार लोक यास जोडले गेलेले आहेत, अशी माहिती विभागातील कपिल शेवाळे यांनी दिली.

कृषी सल्ला सुरूवातीला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता असून इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता काही दिवसात त्या त्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी संपर्क साधणार आहेत. दैनंदिन शेतीचे नियोजन करताना हा हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांना फार उपयुक्‍त ठरत आहेत.

आपल्या तालुक्याकरिताचा हवामान आधारित कृषी सल्ला आपल्या मोबाईलवर मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी केवळ ८४२१०१२१८५ हा क्रमांक सेव्ह करून यावर फक्त आपल्या तालुक्याची नावे व्हाट्सअँपद्वारे मेसेज करावा. शेतकऱ्यास त्याच्या तालुक्याच्या ग्रुपमध्ये समाविष्ठ करण्यात येईल. व त्यास हवामान आधारित कृषी सल्ला नियमित प्राप्त होईल. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व विद्यापीठाद्वारे प्रसारित केला जाणारा हवामान अंदाज व कृषी सल्ला आपल्या शेतीमध्ये अवलंबावा, असे आवाहन डॉ आनंद सोळुंके यांनी केले आहे. (Taluka wise weather forecast in Ahmednagar district and based on that agricultural advice is given through message)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: पोलिस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त मुख्याध्यापकास लुटले

SCROLL FOR NEXT