Tamasha artiste, Fadmalak's fast in Narayangaon 
अहिल्यानगर

तमाशा कलावंत, फडमालकांचे नारायणगावात उपोषण

शांताराम काळे

अकोले : कोरोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने एका नव्या पैशाचीही मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 21 सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगाव येथे महाराष्ट्रराज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. 

महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही. चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावित नाही. अशी खंत या कलावंतांची आहे. म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनांनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु अद्यापही या विषयावर सरकार जागे झालेले नाही.

तमाशा पंढरी अशी ओळख असणार्‍या नारायणगाव येथील तमाशा सम्राज्ञी (कै) विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकासमोर लोककलावंतांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथून तमाशा घडला, अन् ज्या विठाबाईंनी आमच्या तमाशा कलावंताचे नाव जगभर पसरविले त्यांच्या गावातूनच आम्ही कलावंतांच्या मागण्यांसाठी संघर्षाला सुरूवात करणार आहोत, असे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

(कै.) विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र कैलाश, कन्या मालती इनामदार, नातू विशाल तसेच महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत, विकास मंडळाचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, दत्ता महाडिक यांचे सुपुत्र संजय महाडीक, शांताबाई संक्रापूरकर आदी लोककलावंत या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं? स्वतः सांगितलं कारण; म्हणाले- आम्हाला अजिबात...

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Latest Marathi Live Update News : दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला मोठी आग, घराल माणसं अडकल्याची भीती

Beautiful Villages India: निसर्गाचा गुपित! भारतातील 5 सुंदर गावं जे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील

SCROLL FOR NEXT