अहमदनगर sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : सहायक पुरवठा अधिकारी पारनेरचे प्रभारी तहसीलदार

नागरिकांची इतरही कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : ज्योती देवरे यांची १३ सप्टेंबरला बदली झाल्यापासून पारनेरचे तहसीलदारपद रिक्त होते. मागील महिन्यात नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविण्यात आला होता. मात्र, कोणतीच कामे होत नसल्याची लोकांची ओरड सुरू होती. याबाबत दैनिक सकाळने आवाज उठविल्यानंतर काल (ता. 18) नगरचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर निकम यांच्याकडे पारनेरच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे.

वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे बदली झाली. तेव्हापासून पूर्ण वेळ तहसीलदार मिळालेला नाही. गेल्या महिन्यात नव्याने पारनेर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून बदलून आलेल्या गणेश आढारी यांच्याकडे तहसीलदारपदाचा प्रभारी पदभार सोपविला. मात्र, त्यांनी ठरावीक सह्या करण्याशिवाय कोणतेच काम केले नाही. अनेक वेळा शैक्षणिक दाखलेसुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत. शेतकरी तसेच तहसील कार्यालयात असलेली नागरिकांची इतरही कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. त्यामुळे जनतेची मोठी कुचंबणा होत होती. याबाबत सकाळने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Statement : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये काय घडलं, जयंत पाटलांनी घटनाक्रम सांगितला

T20 World Cup स्पर्धेवर निपाह व्हायरसचे संकट? भारतातील सामने दुसरीकडे खेळवले जाणार? बांगलादेशी, पाकिस्तानींचा 'डाव'

Latest Marathi News Live Update : नांदेडचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर शरद पवारांच्या भेटीला

JEE अन् IIT ची तयारी करणाऱ्यांचे लाखो रुपये वाचणार! गुगल फ्रीमध्ये देत आहेत मॉक टेस्ट पेपर; पाहा कशी सुरू करायची प्रॅक्टिस?

Bigg Boss Marathi 6 : तिसऱ्या आठवड्यात धक्कादायक Eviction ? रेडिटच्या रिपोर्टनुसार बाहेर पडला 'हा' सदस्य

SCROLL FOR NEXT