Tehsildar Jyoti Deore has inspected the growing corona in Ralegan Siddhi  
अहिल्यानगर

राळेगणसिद्धीत वाढत्या कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तहसीलदारांनी केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पारनेर तालुक्‍यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भविष्यात लॉकडाउन टाळायचे असेल, तर नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा, असे मत तहसीलदार ज्योती देवरे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच राळेगणसिद्धी येथे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज राळेगणसिद्धीत भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, तालुक्‍यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी गाफील न राहता नियमांचे पालन करावे. अन्यथा मागील वर्षीपेक्षाही भयावह चित्र समोर येऊ शकते. दुकाने, हॉटेल व इतर अस्थापना बंद होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनची परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता प्रत्येकाने काळजी घ्यावी. ग्रामसेवक राजेंद्र कंदलकर, डॉ. अपूर्वा वाघमारे यांना त्यांनी विविध सूचना केल्या. 

मागील काही दिवसांत राळेगणसिद्धी येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकापासून 200 मीटरचा परिसर पुढील 14 दिवसांसाठी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. बॅंक, सोसायटी, पतसंस्था आदी कार्यालये सुरू राहतील. 
- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर 

येथील सर्वच कोरोनाबाधित उपचार घेवून बरे झाले आहेत. तसेच अगोदर सापडलेल्या रुग्णांव्यतिरिक्त नवीन रुग्णांची कुठलीही नोंद झालेली नाही. गावातील दुकाने बंद ठेवली, तर व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ते गावाला परवडणारे नाही. 
- जयसिंग मापारी, माजी सरपंच, राळेगणसिद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT