The tempo of the rice was caught, but case not registered esakal
अहिल्यानगर

Ahmednagar | तांदळाचा टेम्पो पकडला, मात्र गुन्हा दाखल होईना

संजय काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : श्रीगोंदे पोलिसांनी बुधवारी रात्री तांदूळ घेऊन जाणारा टेम्पो पकडून पोलिस ठाण्यात आणला; परंतु त्या काही तास उलटूनही टेम्पोमालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती. टेम्पोतील तांदूळ रेशनिंगचा नाही, याचीही खातरजमा झाली नाही. याप्रकरणी पोलिस व महसूल विभाग दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने, या तांदळाच्या काळ्याबाजाराची साखळी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पारगाव सुद्रिक फाटा येथील एका शीतकरणगृहाच्या ठिकाणी पोलिसांना तांदळाचा टेम्पो आढळला. संशय आल्याने तो ताब्यात घेतला. त्यापूर्वी टेम्पोचा चालक पळून गेल्याने, पोलिसांनी टेम्पो ठाण्यात आणून लावला. या टेम्पोतील तांदूळ रेशनिंगचा आहे की नाही, याची तपासणी होण्याबाबत तहसीलदारांना पत्र दिले, मात्र त्यांच्याकडून उशिरापर्यंत कुठलाही अभिप्राय आला नाही.

श्रीगोंद्यात मोठे रॅकेट कार्यरत...

तालुक्यात यापूर्वी रेशनिंगचा तांदूळ, गहू काळ्याबाजारात विकण्यासाठी नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रेशनिंगचे धान्य काळ्याबाजारात विकणारे मोठे रॅकेट तालुक्यात सक्रिय आहे. यात महसूल, पोलिस आणि काही सामाजिक कार्यकर्तेही गुंतलेले असल्याची चर्चा आहे. रेशनिंगचा माल तालुक्यातून वेगवेगळ्या भागांतून एकत्र केला जातो. संशयाला जागा नको म्हणून तो वेगळ्या गोण्यांत भरून पाठविला जातो. हे काम अतिशय सफाईदारपणे केले जाते.

''पोलिसांनी टेंम्पो पकडला त्याच वेळी गुन्हा दाखल करून चालक- मालकाला ताब्यात घ्यायला हवे होते. मला पोलिसांनी पत्र दिले. त्याला मी योग्य उत्तर देईन. हा तांदूळ रेशनिंगचा आहे की नाही, हे समजणार नाही.'' - मिलिंद कुलथे, तहसीलदार

''माहिती मिळाल्याने आम्ही टेम्पो पकडला. त्यातील तांदूळ रेशनिंगचा आहे की नाही, हे तपासण्याचे काम आमचे नाही. तहसीलदारांचा लेखी खुलासा आल्यानंतर पुढची कारवाई करू.'' - रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं 28 हजारांनी स्वस्त! दसरा-दिवाळीनंतरही घसरण कायम; लग्नसराईआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजा भाव

Nagpur News: पाण्याची पातळी रोज एक टक्का खोलात ;तोतलाडोह जलाशयाची स्थिती चिंताजनक, केवळ २२ टक्के साठा शिल्लक

Latest Marathi News Update : नवी मुंबईहून आलेलं विमान चिपी विमानतळावर उतरलं, जल्लोषात स्वागत

Uniform Civil Code : 'देशात समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे'; हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांचे स्पष्ट मत, CM देवेंद्र फडणवीसांनाही केलं 'हे' आवाहन

Pune News: पुण्यातील खराडी-शिवणे रस्त्याचे काम रखडले; वडगाव शेरीत २४ हजार चौ. मीटर जागेचे सक्तीने भूसंपादन

SCROLL FOR NEXT