A ten year old girl has been abused by her father in shrirampur  
अहिल्यानगर

बाप झाला वैरी; श्रीरामपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर)  : तालुक्‍यातील निमगावखैरी येथे दहा वर्षीय चिमुरडीवर पित्यानेच अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यासंदर्भात पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पिडीतेच्या वडीलांविरुध्द गुन्हा दाखल झाला.

राशीनच्या सरपंचावरील कारवाई लालफितीच्या कारभारात अडकली 
 
तालुक्‍यातील निमगावखैरी परिसरात एका पोल्ट्रीफार्मवर काम करीत असलेल्या परप्रांतीय कुटुंबात हा प्रकार झाला. शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी सात वाजता पोल्ट्री फार्मसमोरील घरामध्ये 27 वर्षीय पित्याने स्वत:च्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पिडीतेच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पिडीतेच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन संशयीताला तातडीने अटक केली. 

पोलिसांनी येथील न्यायालयात संशयीत आरोपीला हजर केले. न्यायालयाने आरोपीला पुढील तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. चौकशी दरम्यान आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल बोरसे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT