The tenth performance of the girls is remarkable 
अहिल्यानगर

मुलीच हुश्‍शार! 

दौलत झावरे

नगर  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला असून, मुलींनी नेहमीप्रमाणे बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 97.61 टक्के मुली आणि 94.92 टक्के मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 69 हजार 441 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यांपैकी 38 हजार 331 मुले व 30 हजार 331 मुली, अशा एकूण 69 हजार 53 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील 66 हजार 360 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांत 36 हजार 753 (94.92 टक्के) मुले आणि 29 हजार 607 (97.61 टक्के) मुलींचा समावेश आहे. 25 हजार 847 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून, 24 हजार 505 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 13 हजार 117 जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

जिल्ह्यातील पुनर्परीक्षार्थी म्हणून 6461 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यांतील 6373 जणांनी परीक्षा दिली. त्यांचा निकाल 76.31 टक्के लागला आहे. यामध्ये 14 विशेष श्रेणीत, 116 प्रथम श्रेणीत व 234 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. 

नियमित निकाल 16 टक्‍क्‍यांनी वाढला 
मागील वर्षी दहावीचा निकाल 79.50 टक्के लागला होता. यंदा 96.10 टक्के निकाल लागला आहे. या निकालात 16.60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल मागील वर्षी 30.65 टक्के होता. यंदा तो 76.31 टक्के आहे. यंदा 45.76 टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

अवश्य वाचा ः  कोरोनाने जिल्हा परिषदेतील एका अधिकार्याचा मृत्यू

353 शाळा शंभर नंबरी 
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील 353 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये नगर शहर व नगर ग्रामीणमधील सर्वाधिक 64 शाळांचा समावेश आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्‍याचा क्रमांक लागतो.

शंभर टक्के निकालाच्या तालुकानिहाय शाळा (कंसात टक्केवारी) ः नेवासे 14 (94.23), पारनेर ः 36 (97.30), पाथर्डी ः 28 (95.98), राहाता ः 19 (96.02), राहुरी ः 20 (95.47), संगमनेर ः 43 (97), शेवगाव ः आठ (96.07), श्रीगोंदे ः 31 (97.78), श्रीरामपूर ः 13 (92.68), अकोले ः 33 (95.83), जामखेड ः दहा (96.35), कर्जत ः 19 (96.41), कोपरगाव ः 15 (96.03), नगर शहर व ग्रामीण ः 64 (97.88). 


जिल्ह्याचा निकाल 
शाळांची संख्या ः 987 
नोंदणी झालेले विद्यार्थी ः 69441 
प्रविष्ट झालेले विद्यार्थी 69053 
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ः 66360 

एकूण पास झालेले विद्यार्थी

एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ः 71233
नियमित विद्यार्थी ः 66,360  

पुनर्परीक्षार्थी ः 4863 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT