The terror of leopards at Nimbhere 
अहिल्यानगर

खुरड्यात शिरलेल्या बिबट्याने घातली शेतकऱ्यावर झडप 

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : निंभेरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. दुसऱ्या एका घटनेत शेतात लपलेल्या बिबट्याला दिवसाउजेडी एका शेतकऱ्याने पाहिले. त्यामुळे गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. 

भानुदास गंगाधर नागरे (वय 65, रा. निंभेरे) यांच्या वस्तीवर रविवारी (ता. 21) रात्री बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याने त्यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात शिरण्याचा प्रयत्न केला. कोंबड्या ओरडल्याने नागरे घराबाहेर आले. तेवढ्यात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. भानुदास नागरे यांच्या डोक्‍यावर जखमा झाल्या. बिबट्याने धूम ठोकल्याने नागरे यांचे प्राण वाचले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. 

दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजता भीमराज विठोबा आंधळे यांना त्यांच्या शेतातील गिन्नी गवतामध्ये लपलेल्या बिबट्याने दर्शन दिले. आंधळे यांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्याने पलायन केले. निंभेरे गावाजवळ डोंगरात वन खात्याचे जंगल पसरले आहे. या जंगलात बिबट्याचे वास्तव्य आहे. भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या वारंवार गावात येत असल्याने, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. 
अहमदनगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT