लग्न सोहळा 
अहिल्यानगर

नवरदेवाच्या ताटाचे वटकण कमी पडले, झालेले लग्न मोडले

सचिन गुरव

सिद्धटेक (अहमदनगर) ः असे म्हणतात की, साताजन्माच्या गाठी ह्या पूर्वनियोजित असून ब्रह्मदेवानेच त्या बांधलेल्या असतात. परंतु सद्यपरिस्थितीत या 'नाजूक' होऊ लागलेल्या गाठी कोणत्या कारणावरून तुटतील, ते ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. अशाच बांधलेल्या गाठी तुटण्याची घटना नुकतीच घडली. मानापमान नाट्यावरून थेट ही नातीच दुभंगली. तालुक्यातील एका गावात ही दुर्देवी घटना घडली.

हुंड्यावरून वगैरे छळ होतो, त्यातून मुलीकडील मंडळी सासरच्या मंडळींवर केस करतात. मग मध्यस्थांमार्फत मिटवण्यासाठी पुढाकार घेतला जातो. जी कुटुंब दोन पावलं मागे येतात ते संसाराला लागतात. मात्र, जे अडून बसतात. त्यांच्या आयुष्याचा विस्कोट होतो. कर्जत तालुक्यात घडलेल्या घटनेवरून नेमका दोष कोणाला द्यायचा, हा सवाल आहे. (The marriage of a couple from Karjat taluka broke up due to a minor reason)

लग्नसमारंभ आटोपल्यानंतर वधू-वरांना जेवायला घातले जाते. त्यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधूपक्षाकडून 'वटकण' (रोख रक्कम अथवा एखादी मूल्यवान वस्तू) लावण्याची प्रथा ग्रामीण भागात प्रचलित आहे. एका गावातील लग्न समारंभानंतर जेवताना वराच्या ताटाला वधुपक्षाकडून दोनशे रुपयांचे 'वटकण' लावण्यात आले. मात्र, ही रक्कम फारच कमी असल्याने वरपक्षाचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी वाढीव पैशांची मागणी केली.

सुरवातीला चेष्टेने सुरू झालेला हा विषय नंतर गंभीर बनला. वर पक्षाकडील मंडळी इरेला पेटली होती. अशा किरकोळ विषयावरून बराच काथ्याकूट झाल्याने वधुपक्षाने हा विषय चांगलाच उचलून धरला. अधिक पैशांचे 'वटकण' लावण्याची मागणी झाल्याने वधुपक्षाने त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यातूनच हा विषय टोकाला गेला. पाहुणे मंडळी, आप्तेष्ट तसेच स्थानिकांनी दोन्ही पक्षांची विनवणी करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने विवाहस्थळी पोचले. त्यांनीही मग वधुपित्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु नववधू सज्ञान असल्याने पोलिस अधिकारी माने यांनी शेवटी नववधूचा निर्णय विचारला असता तिनेही सासरी जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर वरपक्षातील मंडळींना हिरमुसले होऊन परतावे लागले.

पोलिस प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात वितुष्ट आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने या तुटू लागलेल्या 'रेशीमगाठी' अधिक घट्ट बांधण्यासाठी विशेष लक्ष देऊन आहेत. वरीष्ठ पोलिस अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या 'नाजूक' रेशीमगाठी पुन्हा बांधण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. (The marriage of a couple from Karjat taluka broke up due to a minor reason)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT