कोरोना रूग्ण
कोरोना रूग्ण 
अहमदनगर

ग्रामीण भागात कोरोनाची हात-पाय पसरायला सुरूवात

दत्ता इंगळे

नगर तालुका ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावे लागले आहे. या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरांबरोबरच ग्रामीण भागातही चांगलाच जाणवला. अनेक कुटुंबांना मोठ्या प्रमाणात शारीरिक, आर्थिक फटका बसला.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हळूहळू काही व्यवसाय, उद्योगधंदे, कार्यालये सुरू झाली. अनेक दिवसांपासून बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने बाजारात नागरिक गर्दी करू लागले आहेत. कोरोनाचा विसर पडल्याने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराचा विसर पडू लागला आहे. (The number of corona patients is increasing in rural areas)

अगदी बिनदिक्कतपणे लोक फिरू लागले आहेत. त्याचा परिणाम या आठवड्यात ग्रामीण भागासह शहरात जाणवू लागला. रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यातच काहींनी शाळा- महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लोकांच्या गाठीशी असतानाही, असे वागणे कितपत योग्य आहे ?

नगर तालुक्यात आजवर एक लाख २५ हजार ४८९ लोकांची स्वॅबतपासणी करण्यात आली. दर महिन्याला ३६ हजार ७२९ जणांच्या तपासण्या करण्यात येत होत्या. यातून १५ हजार ३४९ रुग्ण आढळून आले. त्यापैकी १४ हजार ४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तालुक्यात आजवर सरकारी यंत्रणेच्या आकडेवारीनुसार ४०२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण २.६२ टक्के आहे.

ग्रामीण भागात लसीकरणास टाळाटाळ

नगर तालुक्याला ४१ हजार ३५० डोस (लस) प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील नऊ आरोग्य केंद्रांमधून पहिला डोस ३५ हजार २६७ जणांना, तर दुसरा डोस ६ हजार ६१५ जणांना देण्यात आला. ८८२ डोस वाया गेले असून, ३५० कुप्या (व्हायल) शिल्लक आहेत.

नियमांचे पालन करून तिसरी लाट थोपवावी

शहरांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनाची तिसरी लाट थांबवावी. सार्वजनिक उत्सव, लग्नकार्य, यात्रा, गर्दीची ठिकाणे, सहली, पर्यटनस्थळांवरील गर्दी टाळावी. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा कसोशीने वापर करावा. घरातील व्यक्तींना बाहेरून भेटण्यासाठी आलेल्या अतिथींशी अंतर ठेवूनच राहावे. स्वतःबरोबरच कुटुंब व समाजाची काळजी घ्यावी.

- डॉ. अनिल ससाणे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी

(The number of corona patients is increasing in rural areas)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT