श्रीगोंदे : पेडगाव येथील भीमा नदीपात्रात सुरु असणाऱ्या वाळूचोरीत काही अधिकाऱ्यांचीच मिलीभगत समोर येत आहे. महसूल, पोलिस आणि वनविभागाच्या मेहरबानीवर सुरु असणाऱ्या तेथील वाळू चोरीत वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 'शुटर' ( वसुली करणाऱ्या आणि खबर देणारे) लोकांच्या वाटपामुळे चोरच हतबल झाले आहेत.
आता आम्हालाच या चोरीत परवडत नसल्याचे वाळूचोरच बोलू लागल्याने ही वाळूचोरी नेमकी कुणासाठी सुरु आहे, याची खमंग चर्चा सुरु आहे.
हेही वाचा - चीननेच बनवला कोरोना व्हायरस
पेडगाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना बंदी केलेल्या धर्मवीर गडाचे ठिकाण आहे. त्यांच्या वेदनांच्या खुणा अजूनही ताज्या असल्या तरी सध्या पेडगाव वेगळ्याच कारणांनी गाजत आहे. याच धर्मवीर गडालगत असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रातून होणारी वाळूचोरी व त्यातील भागिदारी गाजत आहे. नदीपात्रातून जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचे उत्खनन करुन त्याचे इच्छितस्थळी साठे केले जात आहेत. यात काही ठिकाणी वन विभागाचे जंगल उपयोगी आणले जात आहे.
वाळूचोरी हा विषय नवीन नसला तरी पेडगावच्या वाळूचोरीत अनेक अधिकारी वेड्याचे सोंग घेवून वावरत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून तेथे रोज सात यंत्रांच्या मदतीने वाळू उपसा सुरु आहे. सध्या कोरानात यंत्रणा अडकली असल्याचे दाखवून प्रशासनच या वाळूचोरीत गुंतल्याने ही चोरी बिनधास्त सुरु आहे. वाळूचोरांनी सगळ्यांना 'ठरवून' दिले असतानाच 'साहेबां'च्या जवळचे लोक यात थेट भागीदारी करीत असल्याने वाळूचोर बिनधास्त होते.
सध्या हेच चोर हतबल झाले आहेत. वाटप करण्यातच कष्ट वाया जात असून आमच्या हाती 'खास' काही राहत नसल्याचे कथन काही जणांनी ऐकविले. एरवी महसूल, पोलिस, वनविभागाचे अधिकारी वाळू चोरी पकडतात. येथे मात्र पेडगावला सगळे सुरु असतानाच तिकडे यातील कुणीच फिरकत नाही. कोरोनाचे कारण पुढे केले जात असले तरी अनेकांना यातील माल 'पोच' होत असल्याने कुणीही कारवाईचा आसुड न उगारता कोरोनाच्या कामात गुंतवून घेतले आहे.
मूळात तेथील वाळू चोरी सुरू आहे, याबद्दल कामगार तलाठ्याला कसे माहिती नाही. ते गावातच थांबत नसल्याच्या तक्रारी असून वाळूचोरी बिनधास्त सुरु असण्याचे मूळ तेथेच असल्याचे समजले.
माझ्या जवळचे कोणी नाही
पेडगाव येथे वाळूचोरी सुरु असल्याच्या तक्रारी आल्याने तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पाठवले आहे. वाळूचोरी सुरु असल्याचे पंचनामे आल्यानंतर या प्रकरणी तलाठ्यांना दोषी धरले जाणार आहे. त्यांच्यावरही सक्त कारवाई होईल. आपल्या जवळचे यात कुणीही गुंतलेले नाही.
- महेंद्र माळी, तहसीलदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.