The time of counseling will be fixed in the Zilla Parishad
The time of counseling will be fixed in the Zilla Parishad 
अहमदनगर

जिल्हा परिषदेत बदल्यांबाबत समुपदेशनाचा मुहूर्त ठरणार...

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील 33 संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या याद्या जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर हरकती अन्‌ आक्षेप आल्यानंतर त्या निकाली काढून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर समुपदेशन करण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ उद्या (सोमवारी) होत आहे. 

कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी मर्यादा आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 30 जणांमध्ये बैठका घेण्यास जिल्हा परिषद प्रशासनाला परवानगी दिली. त्यानुसार बैठका घेण्यास सुरवात झाली असून, समुपदेशनही त्याच पद्धतीने करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सुरू केले आहे.

एका वेळी 25 कर्मचाऱ्यांना बोलावून, पाच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुपदेशन करण्याचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला आहे. एकेक तासाचे अंतर देऊन कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असले, तरी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यानंतर समुपदेशनाचा निर्णय होणार आहे. 

मात्र, समुपदेशनाची प्रक्रिया कधी करायची, याचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले उद्या निर्णय घेणार आहेत. 

समुपदेशनाच्या प्रक्रियेस वेळ लागणार 
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया एक ते दोन दिवसात संपत होती. मात्र, कोरोना संकटामुळे या वर्षी या प्रक्रियेला सहा ते सात दिवस लागणार आहेत. 

बदल्यांच्या प्रक्रियेवर आलेल्या हरकतींवर निर्णय घेतल्यानंतर 25चा गट करून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याच्या नियोजनाची आखणी केली असली, तरी समुपदेशनला किती जणांना बोलवावे, याचे मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहे. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT