Former.jpg 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांनो अशा व्यापाऱ्याला सामान देऊ नका, नाही तर

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, कारेगावसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून एका व्यापाऱ्याने सोयाबीन, मका, हरभरा खरेदी केले होते. मात्र, हा व्यापारी रविवारी मध्यरात्री माळवाडगाव येथून कुटुंबासह पसार झाल्याने शेतकऱ्यांनी डोक्‍याला हात लावला आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे व्यापाऱ्याने दुकान उघडले नाही. नंतर हा व्यापारीच पसार झाल्याचे समोर आल्यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

याबाबत शेतकरी नानासाहेब आसणे, रावसाहेब आसणे, मंगलबाई शिंदे, विजय कुदळे, सोपान नाईक यांच्यासह तालुक्‍यातील 10-15 शेतकऱ्यांनी तालुका पोलिस ठाण्यात चंदन ट्रेडिंग कंपनीचा मालक रमेश रामलाल मुथा व मुन्नाशेठ ऊर्फ गणेश रामलाल मुथा यांच्याविरोधात तक्रार दिली. व्यापाऱ्यास कडक शासन करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार लहू कानडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक मसूद खान यांना दिले. 

माळवाडगाव परिसरात काही वर्षांपूर्वी मुथा याने किराणा व्यवसाय सुरू केला. सोबतच तो परिसरातील धान्य खरेदी करू लागला. अनेक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन लाखो रुपयांचे सोयाबीन, मका, हरभरा त्याने खरेदी केला. शेतमाल वजन करून ताब्यात घ्यायचा. बाजारभाव वाढल्यानंतर सामानाची  रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्याने लाखो रुपयांचे सामान येथील अंबिका सहकारी पतसंस्थेच्या गोदामात तारण ठेवून 75 टक्के रक्कम घेतली. 

प्रारंभी काही शेतकऱ्यांना चढ्या भावाने पैसे देऊन मुथा याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला. पैसे देताना ते बॅंकेत ठेवण्याऐवजी आपण एक टक्का वाढवून देतो. केवळ महिन्याला व्याजाचे पैसे देण्याचे आमिष त्याने दाखविले. त्यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT