Two acres of sugarcane caught fire in the radish factory group area.jpg 
अहिल्यानगर

अखेर ऊस तोडणी कामगारांचा संसार वाचला, ऊसाच्या आगीत सत्तर झोपड्यातील संसार वाचविण्यात यश

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : मुळा कारखाना गट परिसरात दोन एकर ऊसाला आग लागली आणि जवळच राहत असलेल्या ऊसतोडणी कामगारांनी मोठा टाहो फोडला. ऊस जळून खाक झाला असला तरी सत्तर झोपड्यातील संसार वाचविण्यात यश आले आहे. 

मुळागट ते कुसळकर वस्ती रस्त्यावर असलेल्या गट नंबर ८०१ जवळील गोरक्षनाथ दामू येळवंडे यांच्या ऊसाला बुधवारी दुपारी बारा वाजता आग लागली. जवळच वस्ती व ऊसतोडणी कामगारांच्या सत्तरहून अधिक झोपड्या होत्या. ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुसळकर, जालिंदर दरंदले, नागेश गर्जे, मच्छिंद्र दरंदले, रामदास दरंदले सह मुळा कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर झोपड्या वाचविण्यात यश आले आहे. 

ऊसाच्या शेताला उत्तर दिशेने आग लागली होती. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. वस्ती करुन राहणारे शेतकरी व ऊसतोडणी कामगारांचा मोठा टाहो सुरु झाला. सुरक्षाधिकारी प्रविण चौधरी, कर्मचारी देवदत्त कावले, पांडुरंग भाकड व अग्निशमन बंबाचे चालक आण्णासाहेब शेरे यांच्या प्रयत्नांमुळे जीवितहानी व अनेकांचा संसार वाचला आहे. तेथील ग्रामस्थांचे व सुरक्षा विभागाचे कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT