Various activities were enthusiastically organized on the occasion of the birthday of MP Sharad Chandra Pawar organized by Rayat Educational Complex at Boravke College
Various activities were enthusiastically organized on the occasion of the birthday of MP Sharad Chandra Pawar organized by Rayat Educational Complex at Boravke College 
अहमदनगर

रयत संकुलात विविध उपक्रम उत्साहात ; बोरावके महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयात रयत शैक्षणिक संकुल आयोजित खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयतच्या जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम उपस्थित होते. यावेळी जेष्ठनेते शरद पवार यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाची ओळख करुन देणारा माहितीपट प्रसारीत केला. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनिजिंग कौन्सिंग सदस्य मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठनेते पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारी विविध विषयावरील व्याख्यानमाला पार पडली.

यावेळी प्रा.डॉ.अनिल करवार यांनी मा.शरद पवार यांचे शैक्षणिक विचार विषयावर मार्गदर्शन केले. भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य जेष्ठनेते पवार यांनी केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा पहिला वापर त्यांनी रयतमध्ये करुन सर्वसामान्यांना संधी उपलब्ध करुन दिली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देण्याचे मोठे कार्य त्यांनी केल्याचे डाॅ. करवार यांनी स्पष्ट केले. व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात प्रा.उमेश बनकर यांनी जेष्ठनेते पवार यांचे कृषीक्षेत्रातील योगदान स्पष्ट केले. तृतीय सत्रात प्रा. सुजाता पोखरकर यांनी शरद पवार आणि महिला सबलीकरण विषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी पोखरकर म्हणाल्या, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना सबल करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. महिलांना विविध क्षेत्रात संधी मिळावी म्हणून समग्र महिला धोरण त्यांनी आंमलात आणले. त्यानंतर प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी शरद पवार यांच्या समाजकारण विषयावर प्रकाश टाकला. यावेळी  प्राचार्य डॉ. एम. एस. पोंधे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी प्राचार्य, डॉ.एन.एस. गायकवाड, डॉ. रवींद्र जगधने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, मुख्याध्यापक दिलीप नाईक, संजय दवंडे उपस्थित होते. समारंभाचे औचित्य साधून बोरावके महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ. गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आंब्यांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रा आर. जी. भोर यांनी आभार मानले तर प्रा.अनिता बांद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT