prajakt tanpure criticise nilesh rane 
अहिल्यानगर

राणेंच्या आरे-कारेला मंत्री तनपुरेंचं प्रत्युत्तर, बालकाचा इगो डोंगराएवढा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या सध्या ट्‌विटर वॉर सुरू आहे. रोहित यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याने मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राणेंना सबुरीचा सल्ला दिला होता. हा सल्ला देतानाच पवार हे सभ्य आणि सुसंस्कृत कुटुंब आहे, मात्र, टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात, असे सांगत सावध केले होते. 

राणे यांना ही टीका जिव्हारी लागली होती. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी, रोहित पवार, मंत्री तनपुरे यांच्यावर पुन्हा एकेरीवर येत टीका केली होती. तसेच कुठं यायचं..असे ट्विट करीत थेट आव्हान दिलं होतं. 

या टीकेला प्राजक्त तनपुरे यांनी उत्तर दिलं आहे. ते लिहितात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बालकाच्या नादाला लागू नये. सध्या कोरोनाविरूद्ध लढायचा काळ आहे. बालक असला तरी त्याचा इगो डोंगराएवढा आहे. आणि तो दुखावल्याने दोन दिवसांपासून तो रडतो आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणत चंद्रकांतदादा पाटील यांनी काळे झेंडे दाखवण्यापेक्षा पक्षातील बालकाला काही तरी विधायक काम द्यावं म्हणजे ते गप्प बसंल, असेही सूचवलं आहे. अपशब्दांचा वापर केला म्हणजे त्याला वाटतं आपण खूप पराक्रम केला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोना विरुद्धच्या लढाईत जीव ओतून कार्य करीत आहेत. प्रत्येकजण आपल्या परीने योगदान देत आहे. परिस्थितीचं गांभीर्य नसलेला एक बालक मात्र स्वतःचा आभाळाएवढा इगो दुखावल्यानं दोन दिवस झाले रडतो आहे. अपशब्दांचा वापर केला की लहान मुलांना वाटतं आपण खूप पराक्रम केला.

कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सध्या ट्विटरवर मोठं युद्ध पेटलं आहे. राष्ट्रवादीचे कार्यर्तेही राणे यांच्यावर तुटून पडले आहेत. राणे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही त्यांचा समाचार घेत आहेत. आता मंत्री तनपुरे यांनी केलेल्या ट्विटला राणे काय आणि कसे उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT