The villagers are not observing social distance in the weekly market at Rajur.jpg 
अहिल्यानगर

राजूरच्या आठवडे बाजारात कोरोनाचे नियम धूळीस

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्‍यातील राजुर येथील आठवडे बाजारात ग्रामस्थांनी कोरोनाचे नियम धूळीस मिळविले आहेत. आठवडे बाजारात खरेदीदार व मालाची विक्री करणाऱ्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. शिवाय सॅनिटायझरही कोणाकडे दिसले नाही. सोशलडिस्टंसचा तर ग्रामस्थांना विसरच पडला आहे. त्यामुळे आठवडे बाजारात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. 

राज्य सरकारने ५० पेक्षा अधिक व्यक्‍तींनी एकत्र येऊ नये व सर्व नियम पाळावेत असे आदेश काढले आहेत. लग्न समारंभासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. मात्र, हे नियम पाळले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या लोक बिनधास्तपणे सामाजिक अंतर न पाळता फिरत आहेत. स्थानिक कमिटी, प्रशासन याबाबत कठोर पावले उचलत नाही, तोपर्यंत लोकांमध्ये जागृती होणार नाही, असे काहींचे मत आहे.

याबाबत तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्थानिक सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, संस्था, पोलिस पाटील, कोतवाल यांनी याबाबत सतर्क राहून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, आठवडे बाजारात फिरणारे ग्राहक व विक्रेते कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT