Viral: Corona virus made in China in a laboratory ... claims a Japanese scientist 
अहिल्यानगर

व्हायरल ः कोरोना व्हायरस चीननेच बनवला...जपानच्या शास्त्रज्ञाचा दावा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जगाने चीनला धारेवर धरायला सुरूवात केली आहे. अमेरिका तर त्यांच्यावर सातत्याने आरोप करीत आली आहे. चीनने संपूर्ण जगावर राज्य करण्यासाठीच कोरोना व्हायरसची निर्मिती केल्याची चर्चा असते. काही प्रसार माध्यमांनी तसे वृत्तही दिले आहे. आता कोरोनाबाबत जपानच्या नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञाने दावा केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

डॉ. तासुकु होंजो असे त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. त्यांना सन २०१८मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे. कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नाही. तो वुहानच्या प्रयोगशाळेत बनवला गेला आहे. तो नैसर्गिक असता तर स्वीत्झर्लंडसारख्या देशात टिकलाच नसता. किंवा उष्ण कटीबंधीय देशात त्याचा शिरकाव झाला नसता, अशा आशयाचे ते वृत्त आहे. आणि समाज माध्यमावर व्हायरल होते आहे. भारतातीलच काही आघाडीच्या हिंदी दैनिकांनी याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.

सर्व लॅब टेक्निशियनचा मृत्यू

डॉ. होंजो यांच्या नावे दिलेल्या त्या वृत्तात म्हटले आहे की, मी गेल्या चाळीस वर्षांपासून जीव-जंतु आणि व्हायरसवर संशोधन करीत आहे. त्यामुळे छातीठोकपणे सांगू शकतो, असा व्हायरस असूच शकत नाही. त्याची निर्मिती केली गेली आहे. मी चीनमध्ये चार वर्षे काम केले आहे. तेथील शास्त्रज्ञांना माझ्या कामाविषयी माहिती आहे. आणि मलाही त्यांच्या कामाची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मी तेथील शास्त्रज्ञांंना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सर्वांचेच फोन बंद आहेत.आता चीन सांगते आहे की त्या सर्व लॅब टेक्निशियनचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत संशय वाढला आहे.

माझे नोबेल काढतील

मी नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ आहे. मी खोटे बोलू शकत नाही. तसे झाले तर माझे नोबेल काढून घेतले जाईल. परंतु मी दाव्यानुसार सांगतो की, चीनने हा व्हायरस प्रयोगशाळेत बनवला आहे. एक ना एक दिवस हे सत्य बाहेर येईल, असेही त्या वृत्तात म्हटले आहे.

चीनचे गौडबंगाल

चीन सरकार आणि तेथील जनतेविषयी जगाला काहीच माहिती होत नाही. ते देतील तेवढीच माहिती बाहेर येते. चीनच्या कार्यपद्धतीवर कोणताच देश विश्वास ठेवत नाही. अमेरिकेने कोरोनाबाबत केव्हाच जबाबदार धरले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारणदेखील सुरू आहे. डॉ. होंजो यांच्या नावाने दिलेले वृत्त खरे आहे की असत्य आहे. याविषयी बऱ्याच शास्त्रज्ञांची मतमतांतरे आहेत. एवढे मात्र नक्की, होंजो यांच्या दाव्याने संपूर्ण जगाला विचार करायला लावले आहे.

काय म्हणतात, डॉ. होंजो

द लॉजिकल इंडियन या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्ताबाबत म्हटले आहे की, डॉ. होंजो यांच्या नावाने दिले गेलेले वृत्त निखालस खोटे आहे. डॉ. होंजो यांनीही या वृत्ताबाबत साफ इन्कार केला आहे. हे वृत्त केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील आघाडीच्या दैनिकांनी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे संभ्रम कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT