The virus also penetrated into tomatoes 
अहिल्यानगर

टोमॅटोतही घुसला व्हायरस...पन्नासहून अधिक गावांतील शेतकरी हैराण

सूर्यकांत नेटके

नगर, ः कोरोना व्हायरसने माणसांना परेशान करून टाकले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांतही विषाणू घुसला आहे. तो तीन प्रकारचा आहे. टोमॅटोचे फडच्या फड त्याने ग्रासले आहेत. ही असली आपत्ती पहिल्यांदाच आली असल्याचे शेतकरी सांगतात.बाधा झालेली टोमॅटो प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहेत. हे नवं संकट उभे राहिल्याने शेतकरी धास्तावला आहे. 

नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर तालुक्यातील सुमारे पन्नासपेक्षा अधिक गावांतील साडेतानशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील टोमॅटो पीकाला त्याची बाधा झाली आहे. या टोमॅटोने आरोग्यावर काही परिणम होतो आहे का, हेही अजून समोर आलेलं नाही.

या व्हायरसमुळे शेतकऱयांचे कष्ट तर वाया गेलेच, पण उत्पादन खर्चापोटीचे सुमारे पंधरा कोटी रुपयापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बाधीत क्षेत्राचा आणि नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आतापर्यत सुमारे सव्वा सहाशे शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नुकसान झाल्याबाबत लेखी तक्रार केली आहे. नुकसानीचे कारण निष्पन्न झाल्यानंतर नुकसान भरपाई किंवा अन्य पुढील प्रक्रिया होणार आहे.  

अकोले, संगममेर तालुक्यातील बहूतांश गावांत टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दोन्ही तालुक्यात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र साधारण आडीच हजार असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक शेतकऱयांनी टोमटोची लागवड केली. त्यानंतर अगदी उत्पादन हाती येई पर्यत टोमॅटोचे पीक जोमदार होते. मात्र प्रत्यक्ष फळ हाती आल्यानंतर मात्र फळांत सदोषपणा दिसून आला.

फळांचा रंग बदललेला दिसला तर त्यातील कडकपणाही झाडाला असतानाच नाहीसा होतोय. फळांचा आतील भागाच्याही रंगात बदल होत आहे. त्यामुळे बाजारात या टोमॅटोला मागणी नसल्याचे अनेक शेतकऱयांना अनुभव आला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून टोमॅटोचे पीक घेणाऱया अनुभवी शेतकऱयांना पहिल्यांदाच असा अनुभव आला आहे. टोमॅटोवर तीन विषाणुजन्य रोगाची टोमॅटोला बाधा झाली आहे. या विषाणुजन्य ब्राऊन रुगोस या रोगाबाबत अजून पुरावे नाहीत. 

विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव थेट टोमॅटोच्या फळावर होत असल्याने अकोले, संगमनेरात सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्राला बाधा झाली असून पिकांचे 90 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पन्न तर निघाले नाहीच, पण उत्पादन खर्चापोटी सुमारे पंधरा कोटी पेक्षा अधिक फटका बसला आहे. अकोल्यातील 302 तर संगमनेरातील साधारण सव्वातीनशे शेतकरयांनी याबाबत कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. 

कृषी विद्यापीठाकडून पाहणी
टोमॅटोवर विषाणुजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीची चार दिवसापुर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोग शास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डाॅ. एस. व्ही. कोळसे, डाॅ. विवेक शिंदे, भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डाॅ. भालेकर, डाॅ. अनिकेत चंदनशिवे, किटक शास्त्रज्ञ विभागाचे डाॅ. एस. व्ही. पवार, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या पथकाने टोमॅटो पिकांच्या लागवड बियाणांनुसार दोन्ही तालुक्यात 34 लाॅटमधील नुकसानीची पाहणी केली. सोमवारी प्रत्येक लाॅट नुसार 34 नमुने तपासणीसाठी बंगलोरला पाठवली जाणार आहेत. 

  • अकोले, संगमनेरमधील स्थिती 
  • - एकून टोमॅटो लागवड क्षेत्र ः 2500 (सरासरी)
  • - रोगामुळे बाधीत क्षेत्र ः 350 हेक्टर 
  • - उत्पादनाचे सरासरी नुकसान  ः 90 टक्के 
  • - आर्थिक फटका ः सुमारे 15 कोटी (हेक्टरी सरासरी चार लाख)
  • - शेतकऱयांनी केल्या लेखी तक्रारी ः 625 

अनेक वर्षापासून आम्ही टोमॅटोचे उत्पादन घेतो. असा अनुभव पहिल्यांदाच आलाय. यंदा पीक  खराब असल्यानेच आमचे नुकसान झाले. प्रत्येक शेतकऱयांना हेक्टरी चार ते साडे लाख रुपयाचा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून सर्व शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळावी. 
- सुरेश नवले, शेतकरी, उंचखडक, ता. अकोले, जि. नगर  

काढणीला आलेला टोमॅटो पीकांचे नुकसान होत आहे. त्याबाबत शेतकऱयांच्या लेखी तक्रारी दाखल असून कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञाच्या पथकाने पाहणी केली आहे. तपासणीसाठी टोमॅटोचे नमुने बंगलोरला पाठवले जाणार आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील बाबी ठरवल्या जातील.
- सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर जि. नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT