The water of Visapur soon to the soup 
अहिल्यानगर

आनंदाची बातमी.... या योजनेतून मिळणार सुप्याला पाणी 

मार्तंड बुचुडे

पारनेर ः विसापूर तलावातून सुपे गावासाठी सुमारे 14 कोटी 31 लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या पाणीयोजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांतच गावाला विसापूर तलावातून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. अनेक वर्षांपासून गावाला रोज पाणीपुरवठा करणे शक्‍य होत नसल्याने व वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ही पाणीयोजना उभारण्यात येत आहे.

सुपे गावासाठी सध्या असणारी पाणीयोजना जुनी आहे. त्या योजनेचा उद्‌भवही कायमस्वरूपी नसल्याने ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आता तर सुपे एमआयडीसी विस्तारत असल्याने गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळही वाढत आहे. त्यासाठी नव्याने विसापूर तलावातून सुमारे 24 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकून व 20 हजार लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल अशा 14 कोटी 31 लाख रुपये खर्चाच्या पाणीयोजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 

अशी आहे नवी पाणीयोजना 
विसापूर तलावात 150 अश्‍वशक्तीचे दोन वीजपंप टाकून पाणी आठ इंच जलवाहिनीद्वारे सुपे येथे आणले जाणार आहे. हे पाणी प्रथम सुपे येथील खडकवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या शुद्धीकरण केंद्रात टाकले जाईल. तेथील जलकुंभाची क्षमता अडीच दशलक्ष लिटर आहे. तेथून शुद्ध केलेले पाणी उंच उभारलेल्या सहा व दोन बैठ्या, दोन अशा आठ टाक्‍यांमध्ये टाकले जाईल. या सर्व जलकुंभांची साठवणक्षमता चार लाख 70 हजार लिटर आहे. तेथून हे पाणी गावातील वितरिकेद्वारे घरोघरी पुरविण्यात येईल. 

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबणार आहे. ही योजना लवकरच कार्यान्वित करण्याचा मानस आहे 
- राजू शेख, सरपंच, सुपे  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT