The winds of change of so many officers and employees in the administration ... the green signal of the government 
अहिल्यानगर

जिल्हा प्रशासनातील इतक्‍या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे...सरकारचा ग्रीन सिग्नल 

विनायक लांडे

नगर ः कोरोनाच्या काळात लांबणीवर पडलेल्या प्रशासकीय बदल्यांना राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 जुलैपर्यंत या बदल्या होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासकीय वर्तुळातून मिळाले. 

महसूल प्रशासनात नायब तहसीलदार, तहसीलदारांच्या बदल्यांचे अधिकारी विभागीय आयुक्तांकडे असतात. शिपाई, अव्वल कारकून, तलाठी, मंडलाधिकारी या बदल्यांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. साधारणपणे तीन वर्षांच्या कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र, प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया कोरोना काळामुळे लांबणीवर पडली होती. मात्र, राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्याने प्रशासकीय बदल्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आहेत.

प्रत्येक संवर्गातील, नियमात बसणाऱ्या 15 टक्के बदल्या शासन निर्देशानुसार होणार आहेत. जिल्हा प्रशासनातील दीडशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. यात नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, अव्वल कारकून, कारकून, तलाठी यांचा समावेश आहे. येत्या 31 जुलैपर्यंत हे बदली आदेश जारी होणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT