The winning candidate from Sonai Gram Panchayat has visited the losing candidates.jpg 
अहिल्यानगर

सोनई ग्रामपंचायतीमधील सदस्यांची अशीही दर्यादिली

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार राग, द्वेष आणि सुडबुध्दीने झाला असला तरी विजयानंतर झालं गेलं विसरुन जगदंब मंडळाच्या विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांची भेट घेत आभार मानले आहेत. हे वेगळेपण ग्रामस्थांना चांगलेच भावले आहे.

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी फार पुर्वीपासून ही परंपरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवलेली आहे. साखर कारखाना, सेवा संस्था, ग्रामपंचायत व इतर निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार पराभूत उमेदवार व प्रमुख जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेवून आभार मानतात. बिनविरोध सदस्य अर्ज माघारी घेणा-यांना भेटून आभार मानत आलेले आहेत.

गडाखांचा पायंडा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर मंडळाच्या विजयी १६ सदस्यांनी आपआपल्या प्रभागात जाऊन पराभूत उमेदवारांची भेट घेवून आभार मानले. विकास कामांबाबत आपल्या सुचनेस अग्रक्रम देवू असे सांगितले. प्रभाग तीनमधील उमेदवार सविता अंबादास  राऊत यांनी पराभूत उमेदवार अनिता खेसमाळसकर यांना पेढा भरुन स्वागत केले. श्वेताली दरंदले, सुरेखा पवार, विद्या दरंदले व इतर सदस्यांनी हा उपक्रम आपल्या प्रभागात राबविला. 

लोकशाहीचा आदर म्हणून आमच्या ग्रामविकास मंडळाने सर्व जागा लढल्या. आमचा एक उमेदवार विजयी झाला. काहींचा थोड्या मताने पराभव झाला. हा पराभव स्विकारत आम्ही सुध्दा कुठलाच राग द्वेष ठेवला नाही.
- प्रकाश शेटे, ग्रामविकास मंडळ प्रमुख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT