A written examination was held for the recruitment of posts in the Health Department of the State Government 
अहिल्यानगर

आरोग्य विभागाच्या परीक्षेत एका बाकावर दोन उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील विविध 54 पदांच्या साडेआठ हजार जागांच्या भरतीसाठी गेल्या रविवारी (ता. 28) लेखी परीक्षा झाली. त्यात राहुरी तालुक्‍यात एकमेव परीक्षा केंद्र असलेल्या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात एकेका बाकावर दोन-दोन परीक्षार्थी बसल्याचे समोर आले आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेवरील वाढता ताण व रिक्त पदे लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने आरोग्य विभागात रिक्त पदांपैकी 50 टक्के भरतीस मान्यता दिली. त्यानुसार राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा झाली. राहुरीतील उमेदवारांसाठी तालुक्‍यातील एका गावातील इंग्रजी माध्यमाचे खासगी विद्यालय परीक्षा केंद्र होते. मात्र, अपुऱ्या बैठकव्यवस्थेमुळे एकेका बाकावर दोन-दोन उमेदवार बसविले होते.

एकमेकांची उत्तरे पाहत, रमत-गमत उमेदवारांनी परीक्षा दिली. काही खोल्यांमध्ये परीक्षार्थींचे क्रमांक बाकावर नसल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या परीक्षेचा पुरता फज्जा उडाला. एका परीक्षार्थीने केंद्रावरील बैठकव्यवस्थेचे छायाचित्रण केल्याने हा प्रकार समोर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT