Yatra of village deity mohiniraj at nevasa has been canceled.jpg 
अहिल्यानगर

नेवाशातील ग्रामदैवत मोहिनीराजची यात्रा रद्द

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : महाराष्ट्रासह जगातील अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या नेवासेचे ग्रामदैवत मोहिनीराजची यात्रा यावर्षी कोरोनामुळे होणार नसल्याचे पंच कमिटी व पुजारी बडवे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे. 

आजी आमदारांनी फोडला नवीन पाणी पुरवठा योजनेचा नारळ; मात्र महिला दाद मागायला माजी आमदाराच्या दारात
 
नेवासे शहराचे ग्रामदैवत विष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव अर्धनारीनटेश्वर मोहिनीराजाचे मंदिर आहे. महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात अनेक ब्राह्मण कुटुंबांचे हे कुलदैवत असल्याने यात्रेच्या १५ दिवसात अनेकजण देवाला नवस फेडणे अथवा दर्शनासाठी येत असतात. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारी ही यात्रा जाहीर भागवत कथा कीर्तन, पालखी सोहळा, काला यासह पाच दिवसांचे गाव जेवण पंगती यासाठी प्रसिद्ध आहे. (ता.४) मार्च रोजी या यात्रेची सांगता होणार होती. 

या दरम्यान लाखो भाविक नेवाशात येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरच्या देवस्थानचे पंच कमिटी व पुजारी बडवे यांनी यावर्षी यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले आहे. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी (ता. २०) फेब्रुवारीपासून मंदिरांमध्ये भागवत संस्कृत संहिता वाचली जाणार असून यावेळी मंदिरात समयांचा दीपोत्सव सात दिवस होणार आहे. त्यानंतर पाच दिवस मोहिनीराज महाराजांची उत्सव मूर्ती पाच दिवसासाठी पाक शाळेत जाण्याऐवजी मंदिरातच गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी ठेवली जाणार आहे व पाच दिवसांनी पुन्हा एकदा विधीवत पूजा होऊन मूर्ती मूळ जागी विराजमान होणार आहे. 
 
यावर्षी पालखी सोहळा काला, पंगती, यात्रा, जाहीर भागवत कथा, कुस्ती हंगामा, किर्तन तसेच मंदिरावर नवसाचा झेंडा लावण्यासाठी असलेल्या झेंडा मिरवणुका रद्द करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी याविषयी नोंद घ्यावी, असे पंच कमिटीने जाहीर केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT