ZP will create a garden on Laltaki 
अहिल्यानगर

लालटाकीवर झेडपी फुलविणार बाग

दौलत झावरे

नगर ः लाल टाकी परिसरातील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेवर उद्यान उभारण्याचा निर्णय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या परिसरात जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. उर्वरित मोकळ्या जागेवर बाग फुलविण्याचा संकल्प अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सोडला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने सुरवात केली असून, त्यासाठीचा सर्व खर्च लोकसहभागातून करण्यात येणार आहे.

शहरातील लाल टाकी परिसरातील मोक्‍याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची सव्वादोन एकर जागा आहे. त्यावर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची सहा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची 22 आणि परिचर व वाहनचालकांची 24 निवासस्थाने आहेत. उर्वरित सव्वा एकर भूखंड मोकळा आहे.

मुलांना खेळण्यासाठी ही मोठी जागा उपलब्ध आहे; मात्र बाग व चांगले मैदान नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे या मोकळ्या भूखंडावर बाग विकसित केल्यास मुलांची मोठी सोय होणार आहे. शिवाय अधिकारी- कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना रात्री व पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी चांगले वातावरण असेल, असा विचार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या मनात आला. त्यांनी हा विचार अधिकारी- कर्मचाऱ्यांसमोर मांडला. त्यास सर्वांनी होकार दिला. 

सर्वांनी एकत्र बसून बागेचे नियोजन केले. प्रत्येकावर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. ठरवून दिलेले काम करण्यासाठी प्रत्येकाने पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

बागेसाठी अंदाजे अडीच लाखांचा खर्च आहे. मात्र, त्याचा बोजा जिल्हा परिषदेवर न टाकता, लोकसहभागातून बाग विकसित करण्यात येणार आहे. प्रत्येक जण वेळ मिळेल तेव्हा येथे श्रमदान करणार आहे. या कामात सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निखील पटारे, प्रदीप रोहकले, कल्याण शेळके अादींनी पुढाकार घेतला आहे.

अशी असेल बागेची रचना 
फुलांची झाडे, बसण्यासाठी बाके व मध्यभागी खेळण्यासाठी मैदान, अशी बागेची रचना आहे. बागेसाठी सगळेच आनंदाने कामाला लागले आहेत. त्यासाठी लहान-थोर श्रमदानही करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT