farmers sucide
farmers sucide sakal
अकोला

अकोला : खरीपात ७३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात व त्यानंतर रब्बीतही अतितवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नैराश्यातून जिल्ह्यातील ७३ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपविली. त्यापैकी प्रशासनाने पाच प्रकरणे अपात्र ठरविली आहेत तर ३४ प्रकरणात फेर तपासणीचा आदेश दिला. गत तीन वर्षांत प्रशासनाने वेगवेगळी कारणे देवून ६९ प्रकरणात अपात्रतेचा शिक्का मारला आहे. त्यासाठी कारणेही व्यसनाधिनता, मानसिक आराजपण व शेतीमुळे आत्महत्या नाही, अशी देण्यात आलीत. तीन वर्षांत जिल्ह्यातील मदतीसाठी ३०६ प्रकरणांची नाेंद झाली.

गत तीन वर्षांत जिल्ह्यात अनियमित वातावरणामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप व रब्बीत ऐन पीक काढणीच्या हंगामातच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी शेतमालाचे उत्पादन घटत आहे. गत तीन वर्षांतील जिल्ह्यातील पैसेवारीही ५० पैसांच्या आत राहली. यावरून शेती उत्पादनाची स्थिती लक्षात येते. परिणामी मशागत व पेरणीसाठीचा खर्चही निघत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढतच आहे. थकीत कर्ज वाढत असल्याने बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्जही देत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांकडे खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय नसताे.

सोने गहाण ठेवून कर्ज उचल करणाऱ्यांची फसगतही सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलावे लागत आहे. मृत्यूनंतरही शेतकऱ्यांच्या मागील ससेमिरा संपलेला नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शासकीय मदतीसाठी पात्र, अपात्र ठरविताना जिल्हास्तरीय समितीकडून निकषांवर बोट ठेवत मदतीपासून शेतकरी कुटुंबांना वंचित ठेवण्याचे प्रकरणे वाढत आहे. तीन वर्षांत ६९ प्रकरणे अपात्र ठरविताना चक्क प्रशासनाने आत्महत्या करणारा शेतकरी मानसिक आजारी असल्याची कारणे दिली आहेत. काही प्रकरणांत तर थेट शेतीच्या कारणामुळे आत्महत्या नसून, व्यवसनाधिनतेमुळे आत्हत्या असल्याची कारणेही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वर्षभर अवकाळीचा ससेमिरा

सन २०२१ मध्ये २१ ते २४ जुलै, सप्टेंबर महिन्यात ६ ते ८ व २० ते २८, डिसेंबरच्या २८ तारखेला अवकाळी पाऊस झाला. ता. ८ व ९ जाेनवारी २०२२ रोजी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या कालावधित झालेल्या पावसाचा फटका सर्वच प्रकाराच्या पिकांना बसला. आता पुन्हा अवकाळी पासवाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तूर पिकाची काढणी सुरू असताना व हरभरा व गव्हाचे पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांतील शेतकरी आत्महत्या

  1.  सन २०१९ : एकूण १२४ शेतकरी आत्महत्या, १०५ प्रकरण मदतीसाठी पात्र, १९ अपात्र.

  2.  सन २०२० - एकूण १५७ शेतकरी आत्महत्या, ११६ पात्र ३७ प्रकरण मदतीसाठी अपात्र.

  3.  सन २०२१ - एकूण १३७ शेतकरी आत्महत्या, ८५ पात्र, १३ प्रकरणे मदतीसाठी अपात्र.

जुलै ते डिसेंबर २०२१ काळातील आत्महत्येची प्रकरणे

  1. जुलै १२ ०८ ०१ ०३

  2. ऑगस्ट ११ ०७ ०२ ०२

  3. सप्टेंबर १० ०८ ०२ ००

  4. ऑक्टाेबर १९ ०८ ०० ११

  5. नाेव्हेंबर १४ ०३ ०० ११

  6. डिसेंबर ०७ ०० ०० ०७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT