life imprisonment
life imprisonment  sakal
अकोला

मूर्तिजापूर : ‘त्या’ आरोपीस दुहेरी जन्पठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : येथील एका लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करणारा आरोपी रिजवान शहा (वय २६) रा. सोनोरी बपोरी याला विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता.२१) आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. १ मे २०१८ ते २१ मे २०१९ दरम्यान विविध आमिषे दाखवून हिंगणगाव (कासारखेड) ता. धामणगाव रेल्वे जि. अमरावती येथील रहिवासी असलेली व सोनोरी बपोरी येथे आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच गावातील रिजवान उर्फ रमजान शहा उर्फ रज्जू बिस्मिल्ला शहा याने विविध आमिषे देऊन मूर्तिजापूर येथील एका लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला होता.

या प्रकाराबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३७७ व पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संगीता गावडे यांनी प्रकरण विशेष सत्र न्यायालयात दाखल केले होते. प्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांनी सात साक्षीदार तपासूण आरोपी रिजवान उर्फ रमजान शहा उर्फ रज्जू बिस्मिल्ला शहा याला दोषी ठरवीत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कलम ३७७ अंतर्गत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, कलम ३५४ (ड) तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ५०६ दोन वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ३, ४ पोक्सो अंतर्गत आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, कलम ७, ८ पोक्सो पाच वर्षे सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ११, १२ पोक्सो मध्ये तीन वर्षे सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले. आरोपीने एक लाख २० हजारांच्या दंडा सह आजीवन कारावास या सर्व शिक्षा एकत्रीतपणे भोगायच्या आहेत. पीडितेच्या वतीने सरकारी वकील के.बी. खोत यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT