Akola action against 733 drivers traffic rules break
Akola action against 733 drivers traffic rules break sakal
अकोला

अकोला : उड्डाणपुलावर नियम मोडणाऱ्यांना शिकवला धडा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : वाहतूक पोलिसांनी शहरातील दोन उड्डाण पुलावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७७३ वाहन चालकांवर कारवाई केली असून संबंधितांवर ४ लाख ४५ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानंतर सदर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

वाहन चालाकांची अधिक संख्या व बेशिस्त वाहन चालवण्याच्या पद्धतीमुळे शहरातील अशोक वाटिका चौक ते अग्रसेन चौक व सिंधी कॅम्प चौकात दररोज छोट्‍या मोठ्‍या प्रमाणात अपघात होत होते. परंतु आता शहरातील दोन उड्डाण पुलांचे लोकार्पण झाल्यानंतर सदर पुल नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुक सुरळीत झाली असून अपघातांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. परंतु असे असले तरी काही नागरिक उड्डाण पुलावर चढण्या उतरण्याचे नियम तोडत आहेत.

पुलावर लावण्यात आलेल्या प्रवेश बंदी, स्पीड लिमिट व इतर सूचनांचे वाहन चालक उल्लंघन करत आहेत. त्यासोबतच पुलावर रॉंड साइड वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहने चालविणे, इशारा भंग करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करने असे प्रकार उड्डाण पुलावर सर्रास सुरु आहेत. त्यामुळे अशा ७३३ वाहन चालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून वाहन चालकांवर ४ लाख ४५ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानंतर सुद्धा अशी कारवाई पोलिसांमार्फत सुरूच राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT