Most Polluted City in Maharashtra sakal
अकोला

Most Polluted City : वऱ्हाडातील अकोला, अमरावती सर्वाधिक प्रदूषित शहर

हवेची गुणवत्ता ढासळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अविकसित एमआयडीसी, प्रदूषित करणारे कोणतेही मोठे कारखाने नाहीत. त्यानंतरही वऱ्हाडातील महानगरपालिका असलेले अकोला, अमरावती ही दोन्ही शहरं राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये आहेत.

गेली सहा वर्षांपासून सातत्याने प्रदूषित शहरांमध्ये या दोन्ही शहरांचा क्रम लागत असतानाही हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गांभिर्याने उपाययोजना होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देशातील १३१ शहर आणि परिसर अतिशय प्रदूषित असल्याचे केंद्र शासनातर्फे जाहिर करण्यात आले आहे. या १३१ शहरात हवेची गुणवत्ता ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक खराब आहे.

केंद्र सरकारकडून या शहरातील हवेच्या गुणवत्तेवर वारंवार नजर ठेवली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शहरांना ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अंतर्गत ठेवण्यात आले आहे.

जेणेकरुन या शहरातील हवेची गुणवत्ता सुधारता येईल. वऱ्हाडातील अकोला, अमरावतीसह राज्यातील १९ शहरातील ‘पार्टिक्यूलेट मॅटर’ (कण द्रव्य) मध्ये २० ते ३० टक्के घट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य २०२४ ते २०२८ या काळासाठी ठेवण्यात आले आहे.

उपाययोजनांकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदूषित शहरांची यादी सादर करुनही त्याची गांभीर्याने दखल न घेतली गेल्याबद्दल सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ चं वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचं वार्षिक सरासरी प्रमाण ४० पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटलं जातं. त्यात अकोला, अमरावती शहरांचा समावेश आहे.

का खराब झाली या शहरांची हवा!

- वाहतुकीची कोंडी, वाहनांमधून निघणारा धूर

- कालबाह्य झालेल्या वाहनांमधून निघणारे घातक धूर

- रस्त्यांवरील धुळी कणांचे प्रमाण अधिक

- उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा

- कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर न करणे

- अकोला शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही

- अकोला, अमरावती शहरात ऑटो रिक्षांची सर्वाधिक संख्या (यात सर्वाधिक कालबाह्य वाहनांची संख्या आहे)

प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून नोटीस

हवेतील गुणवत्ता खराब असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी अकोला महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. दरवर्षी नोटीस बजावूनही प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्याही उपाययोजना महानगरपालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT