Akola Buldana Marathi News Accident to MLA Sanjay Raimulkars vehicle 
अकोला

शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात

सकाळ वृत्तसेेवा

\घाटबोरी (जि.बुलडाणा)  : मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या इनोव्हा गाडीचा 9 जानेवारीला रात्री 12 वाजेदरम्यान जालना येथे अपघात झाला. यामध्ये मुलासह पाच व्यक्ती किरकोळ जखमी झाले.


शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा नीरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र 9 जानेवारीला संभाजीनगरला गेले होते.

परत येताना जालना शहरातील कन्हैयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडी क्रमांक एमएच 28 बीके 2777 चे टायर फुटून तिने रस्त्याच्या खाली 3 ते 4 पलटी घेत सरळ झाली.

या अपघातात नीरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतीक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. नीरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.सुदैवाने आ.संजय रायमुलकर हे मेहकर येथे होते.

तर एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर ते जानेफळ रस्त्यावर आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आमदार संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT